ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव
वर्धा/विशेष प्रतिनिधी:
वर्धा जिल्ह्यात कोरोनाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आता पर्यंत ग्रीन झोन मध्ये असलेला वर्धा जिल्ह्यात आता कोरोनाचा शिरकाव झालेला आहे
तीन दिवसांपूर्वी महिलेचा मृत्यू झाला होता काल रात्री तिचा अहवाल पोझेटिव्ह आला आहे.ही महिला आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील आहे. मागील ४९ दिवसात जिल्हाला ग्रीन झोन मध्ये ठेवण्याकरिता प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले.मात्र बऱ्याच काळानंतर वर्धेत एक रुग्ण सापडला मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यूदेखील झाला
कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. कोरोनाचा पहिला रुग्ण जिल्ह्यात मिळाल्याने खळबळ निर्माण झाली.ग्रामीण भागात रुग्ण आढळल्याने प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. एवढंच नव्हे तर वाशीम जिल्ह्याचा रुग्ण वर्धेत कोरोना पॉजिटिव्ह आढळला आहे. सावंगी रुग्णालयात निमोनियाच्या उपचारासाठी तो दाखल झाला होता. सावंगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
वाशीम येथील 64 वर्षीय पुरुष दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाला होता. आता पर्यत ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या वर्धा जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा आहे