जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांचा उपक्रम
नागपूर : अरूण कराळे
जगात थैमान घालत असलेल्या कोरोना या रोगाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व आरोग्य विभागात काम करीत असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. तर क्षमतेपेक्षा जास्त काम यामुळे या वर्गावर मानसिक तान सुद्धा वाढला आहे. अश्यातच टाळेबंदी असल्याने वेळेवर आहार मिळणेही कठीण होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत हिंगणा विधानसभा क्षेत्रातील हिंगणा, वाडी, हिंगणा एम.आय.डी.सी., बुटीबोरी, बोटीबोरी एम.आय.डी.सी आदी पोलीस स्टेशन, कान्होलीबार पोलीस चौकी व रायपूर, कान्होलीबारा , टाकळघाट येतील प्राथमिक आरोग्य केंद्र व हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर,जीवनसत्व ' क ' च्या गोळ्या व फूड पॅकेट चे वाटप करण्यात आले.
कोरोना विरुद्ध लढा देत असलेल्या पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाने आपली व आपल्या कुटूंबाची सुद्धा काळजी घ्यावी.नागरिकांनी विनाकारण बाहेर पडून प्रशासनावर ताण वाढवू नये. शासन व प्रशासन आपल्या सुरक्षेसाठीच उपाय योजना करून कठोर परिश्रम घेत आहे त्यास आपण सहकार्य करावे असे आवाहन जि. प. सदस्य दिनेश बंग यांनी केली. यावेळी वाडी नगर परिषदचे जेष्ठ नगरसेवक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते राजेश जयस्वाल ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा वाडी नगरपरिषदचे नगरसेवक श्याम मंडपे , जि.प.सदस्य सुचिता विनोद ठाकरे, हिंगणा पंचायत समिती सभापती बबनराव अव्हाळे,राकाँपा हिंगणा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे,महेश बंग, नागपूर पंचायत समिती उपसभापती संजय चिकटे, प.स.सदस्य पौर्णिमा दीक्षित, आकाश रंगारी, प्रा. सुरेंद्र मोरे, विनोद ठाकरे, सुशील दीक्षित, सरपंच प्रेमलाल भलावी, उपसरपंच दीपावली कोहाड, राकाँपा युवा तालुकाध्यक्ष आशिष पुंड, हिंगणा नगर पंचायत नगरसेवक गुणवंता चामाटे,महेशसिंग राजपूत, सिराज शेटे, रफिक महाजन, बालू सवाणे, प्रदीपसिंग चंदेल, दामू गुजर, बुटीबोरी नगर परिषद नगरसेवक संकेत दीक्षित, रमेश साखरे, टाकळघाट सरपंच शारदा शिंगारे, नरेशभाऊ गौरव नागपुरे, राजू गावंडे, हनुमान दुधबळे, नामदेव येलूरे, वामन देवतळे, कान्होलीबारा उपसरपंच प्रशांत गव्हाळे आदीनीं या उपक्रम सहभाग घेतला.