Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १०, २०२०

मेट्रो प्रवासी सेवेमध्ये एका दिवसात ३.२५ लाखाचे उत्पन्न



नागपूर १० - २८ जानेवारी पासून नागपूर करांच्या सेवेमध्ये कार्यरत असलेल्या अँक्वा लाईन मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु झाली असून प्रत्येक आठवड्यात प्रवासी सेवेमध्ये वाढ होत आहे. काल दिनांक ०९ फेब्रुवारी २० फेब्रुवारी रोजी मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल ११% वाढ नोंदविण्यात आली आहे. काल १८०७७ नागरिकांनी ऑरेंज आणि अँक्वा मार्गिकांवर मेट्रोने प्रवास केला व त्यातून तब्बल रु. ३.२५ लाखाचे उत्पन्न महा मेट्रोला प्राप्त झाले आहे. ऑरेंज लाईन मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी तसेच अँक्वा लाईन मार्गिकेवर दर ३० मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु आहे.सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर किवा वासुदेव नगर पर्यंत प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना केवळ २० रुपये मोजावे लागत असून सिताबर्डी इंटरचेंज ते सुभाष नगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स किवा झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन पर्यंतच्या प्रवासासाठी केवळ १० रुपये मोजावे लागतात. मुख्य म्हणजे मेट्रोने आता शाळा आणि कॉलेज मधील विद्यार्थी प्रवास करू लागले आहेत.

लोकमान्य नगर ते खापरी, न्यू एयरपोर्ट,एयरपोर्ट साउथ, एयरपोर्ट आणि जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवासी दर ३० रुपये आहे. शहराच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर मेट्रो सेवा सुरु झाल्याने नागरिकांचा मोठा फायदा झाला आहे. अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या मार्गाहून प्रवास करीत आहेत.ऑरेंज लाईन मार्गिकेवर जय प्रकाश नगर, एयरपोर्ट, एयरपोर्ट साउथ, न्यू एयरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशन तसेच अँक्वा लाईन मार्गिकेवरील झाशी राणी, इंस्टीटयुट ऑफ इंजिनियर्स, सुभाष नगर, वासुदेव नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनवर सेवा उपलब्ध आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.