Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी ०८, २०२०

गोसावी समाजाचा महिला मेळावा



नागपूर/ प्रतिनिधी
सनातन दशनाम गोसावी समाज संस्था नागपूरच्या वतीने नुकताच नागपूर महानगराचा महिला मेळावा पंडित बच्छराज व्यास विद्यालय नागपूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ सुनंदा विजय गिरी तर प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर अर्चना डेहनकर ह्या होत्या. मेळावा प्रसंगी डॉक्टर मंगला योगेश पुरी, दुर्गा पटेल यांची विशेष उपस्थिती लाभली होती. वक्त्यांनी समायोचित मार्गदर्शन केले. महिला सक्षमीकरण बेटी पढाव बेटी बचाव.महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावाअसे आवाहन सौ.अर्चना डेहनकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आघाडीच्या सचिव सौ छाया विजय गोस्वामी यांनी तर संचालन रत्ना प्रशांत पुरी यांनी केले. आभार प्रदर्शन विद्या प्रकाश गिरी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संध्या पुरी, मंजुषा गिरी, साधना बन, कल्पना भरती, मंगला गिरी, निर्मला भारती, वंदना पुरी, बेबी गिरी, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला बहुसंख्य समाज भगिनी उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.