आवाळपूर :-
महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान कार्यरत असलेल्या गट ग्रामपंचायत जेवरा अंतर्गत तांबाडी येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. गावातील सर्व युवकांनी व गावक-यांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचे आयोजन केले.
शिवजयंतीच्या पहाटेची सुरुवात युवकांनी ग्रामस्वच्छते पासुन केली. गावामध्ये सायंकाळी रँली काढण्यात आली. त्यामध्ये गावातील चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, तानाजी, मावळे, म. गांधीजी, गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब व रमाई, म ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, भारतीय सैनिक अशा विविध थोर व्यक्तींच्या वेशभुषा साकारल्या.
तसेच गावातील किशोरी मुला मुुलींनी रँलीमध्ये लेझीमचे उत्कृष्ट सादरीकरण केले. मुलांची भाषणे तसेच शिवरायांचा पाळणा हे कार्यक्रमाचे विशेष होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन श्री आर डी जाधव (जि प शिक्षक) तसेच श्री तुकाराम जाधव (शाहीर) लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावक-यांना शिवचरित्राविषयी सखोल माहिती मिळाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान गावच्या सरपंचा सुवर्णाताई वासेकर यांनी भुषवले.
तसेच प्रमुख अतिथी म्हणुन कुळसंगे पोलिस पाटील,गौतम खाडे, वैशाली नवरे ग्रामपरिवर्तक, अंजली खारकर , संदिप काकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिन्नाथजी हंसकर यांनी केले. नेहमी पेक्षा या वर्षीची शिवजयंती तांबाडीकरांसाठी आकर्षण ठरली.
त्यासाठी गावातील सर्वच युवकांनी पुढाकार घेत कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडला. वैभव राऊत, मंगेश कोरांगे, समिर बोढाले, समिर विधाते, आदित्य राऊत, सागर कुळसंगे, अविनाश मडावी, हर्षल ढबाले व टीम तसेच समस्त गावक-यांनी कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले.