Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी ०७, २०२०

बाजार समितीत ट्रॉलीखाली चिरडून मृत्यू

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती
आवारात एकाचा ट्रॉली खाली चिरडून मृत्यू




येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: कृषी उत्पन्न बाजार समिती
येवला, येथे एक शेतकरी कांदा लिलावा दरम्यान ट्रॅक्टर मागे घेताना- एक जण ट्रॉली खाली आल्याने जागेवरच मृत्यू झाला असून येवला कृषी बाजार समिती आवारात ही हृदयद्रावक घटना घडली आहे .येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा लिलाव झाल्यानंतर खाली पडलेले कांदे भरत असताना ट्रॅक्टर मागे घेत असताना अनिस पठाण (रा कौठखेडे) कांदे भरत होता त्याच वेळी तो ट्रॉलीखाली आल्याने ट्रॉली त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्याच्या मेंदूचा भुगा झाला या घटनेत मृत व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे जमिनीत गेला होता त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता या घटनेतील ट्रॅक्टर हा तालुक्यातील कोळम येथील असल्याची चर्चा आहे पोलीस घटनास्थळी पोहचले असून अजून गुन्हा दाखल नाही

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.