येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: ता; १ जाने रोजी तालुक्यातील ISO प्रमाणित जिल्हा परिषद डिजीटल प्राथमिक शाळा गारखेडे या शाळेत "करूया सन्मान लेकीचा" नव वर्षाचे स्वागताचे औचित्य साधत हा कार्यक्रम घेण्यात आला.यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची गावात फेरी काढून 'बेटी बचाव बेटी पढाव' 'मुलगा-मुलगी एक समान दोघांनाही शिकूया छान' घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मुलींचे त्यांच्या आईवडिलांनी पूजन केले व त्यानंतर मुलींच्या नावाच्या पाट्या मान्यवरांच्या हस्ते मुलींच्या घराच्या दरवाजावर लावण्यात आल्या. या कार्यक्रमास गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री संजय खैरनार तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष खैरनार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संदीप खैरनार व संजय खैरनार हे उपस्थित होते. त्यानंतर शाळेत नवनियुक्त सरपंच संजय खैरनार व उपसरपंच यांचा शालेय व्यवस्थापन समिती द्वारे सत्कार करण्यात आला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप वारुळे यांनी सरपंचांना शाळेच्या विविध मागण्यांसंदर्भात पत्र देऊन सदर मागण्या सोडविण्याबाबत आव्हान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका श्रीमती मला राठोड यांनी प्रयत्न केले.