Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी ०३, २०२०

निसर्गाने पांघरली धुक्याची चादर



येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: तालुक्यातील गारखेड़ा भारम राजापूर व पूर्वेकडील भागात सध्या दाट धुके मोठ्या प्रमाणात आल्याने कांदा गहू हरभरा व भाजीपाला अशा  अनेक रब्बीच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे शेतकरी आता औषध फवारणी करून वैतागले आहे. सध्या धुके हे मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. धुके जास्त असल्यामुळे पीक वाचेन कि नाही अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. निसर्ग यावर्षी शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात साथ देत नसल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडली आहे महागडी औषधे एक एक हात द्यायचा म्हटला तर दहा हजार रुपयांच्या आसपास जातो त्यामुळे . सध्या ढगाळ हवामानामुळे गहू हरभरा कांदा रब्बीचे पीक मोठ्या प्रमाणावर संकटात सापडली आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती आणि यावर्षी पाऊस होऊनही शेतकऱ्यांना उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आहे सध्या कांद्याला पाहिजे त्याप्रमाणे भाव मिळत असल्याने शेतकरी कांदा भाव मिळत असल्याने कांदा वाचवण्यासाठी आहे नाही ते प्रयत्न आटोकाट करीत आहे कांद्याच्या लागवडीचा व मशागतीसाठी शेतीचा रासायनिक खते औषधे मजुरी आधीचा खर्चाचा मेळ कसा बसायचा यामुळे शेतकरी बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने पाऊस येतो की काय पाऊस पुन्हा येतो की काय या धास्तीने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणी सापडले आहे दोन दिवसापासून धुके चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रब्बीच्या हंगाम ही वाया जाणार असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहे धुकेमुळे कांदा पिक गहू हरभरा व भाजीपाला या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे शेतकरी वर्ग औषध फवारणी करण्यासाठी आता वैतागले आहे त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाले आहे यंदाचा खरीप हंगाम आधी शेतकऱ्यांना डोकेदुखी व खर्चिक आणि आर्थिक गणित कोलमडले ठरला असून मक्यावर आलेल्या लष्करी आळी नियंत्रणात आणण्यासाठी खरीप हंगामातील मका अशा पिकांना महागडी औषधे फवारणी करावी लागली असे येथील प्रगतिशील शेतकरी नानासाहेब आहेर यानी आपले मत व्यक्त केले आहे परंतु पुढे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी टाकलेली कांदा रोपे पूर्णता खराब होऊन गेल्याने शेतकरी वर्ग रब्बीच्या आशेने पिकांची पेरणी केली परंतु ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर विविध रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून कांद्याची पात पिवळी पडत असल्याने फवारणी करावी लागत आहे  गव्हाची पेरणी केलेली आहे परंतु ढगाळ हवामानामुळे गव्हाचे पीक पिवळे होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ हवामान बदलामुळे आली आहे हवामान खात्याने सध्या दोन-तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱयांना धडकी वाढली आहे अजून आठ ते दहा दिवसांमध्ये कांदा काढणीस सुरुवात होणार आहे परंतु जर पावसाचे आगमन झाले तर कांदा सडून जाईल व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. औषध विक्रेते यावर्षी जोमात आहे परंतु शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात आहे खर्च केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही व हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी जास्त प्रमाणात वाढली आहे त्यात पुन्हा आता पावसाचा अंदाज यामुळे उभी असलेल्या पिके हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतो की काय निसर्ग या संकटाने शेतकरी बळीराजा चिंताग्रस्त झालेले आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.