Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी ०८, २०२०

लेण्याद्री देवस्थान शुल्क दोन महिन्यात रद्द करणार






जुन्नर  /आनंद कांबळे 
दिल्ली येथील पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक नभीराजन यांची जुन्नरच्या  शिष्टमंडळाने भेट घेतली. लेण्याद्री देवस्थान भेटी करता आकारण्यात येणारे शुल्क करण्रयाची मागणी केली. येत्या दोन महिन्यात  हे शुल्क रद्द होईल असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले  .
 
 जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके ,  माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील, लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष कैलासशेठ लोखंडे, सचिव शंकरराव ताम्हाणे व विश्वस्त जितेंद्रजी बिडवई आदी मान्यवर या शिष्ठमंडळात   होते.

यावेळी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, लेण्याद्री गणपती देवस्थान येथे पुरातत्व विभागामार्फत घेतले जाणारे तिकीट बंद करण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. मंदिराच्या लेणीसह सर्व लेण्याद्री तिकीट मुक्त करण्याचा प्रस्ताव पुरातत्व खात्याचे अतिरिक्त महासंचालक मा. नभीराजन यांच्यामार्फत सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांना पाठविण्यात येईल आणि त्यानंतर दोन महिन्यात तिकीट माफ होईल असे आश्वासन त्यांनी यावेळी चर्चेदरम्यान दिले.
 अष्टविनायक पैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री  येथे येणाऱ्या गणेश भक्तांकडून पुरातत्व विभागामार्फात प्रती व्यक्ती २५ रुपये शुल्क आकारले जात आहे ह्या शुल्क आकारणीच्या विरोधात लेण्याद्री कडे जाणाऱ्या  रस्त्यावर पुन्हा आमरण उपोषण करण्यात आले होते.
                   गोळेगाव ग्रामस्थ, मराठा सेवा संघ जुन्नर, आदिवासी ठाकर समाज व लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने लेण्याद्री शुल्का विरोधात आमरण उपोषण केले होते. 

त्याची दखल घेऊन पुरातत्व विभागाच्या वतीने गणेश भक्तांसाठी लेण्याद्री दर्शन मोफत व लेणी पाहण्यासाठी मात्र वेगळा रस्ता व तिकीट यासाठी सहमती दिली होती. यासाठी सहा महिन्यात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सूचित करण्यात आले होते मात्र सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून देखील पुरत्वविभागाच्या कोणतीच पावले उचलली नसल्याने व देशाच्या कानाकोपर्यातून लेण्याद्री दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला व सहली निमित्त येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत लेण्याद्री दर्शनाचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी 25 डिसेंबर रोजी  संपूर्ण स्वराज्य निर्माण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हर्षल विजय जाधव, मारुती किसन पारधी, सोमा ठका आधान आदी उपोषणास बसले होते.

                       पुरातत्व विभागाकडून गेली कित्तेक वर्ष लेण्याद्री गिरिजात्मकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांकडून शुल्क आकारले जात आहे. सुरुवातीला दोन रुपये, पाच रुपये ,पंधरा रुपये आणि सध्या पंचवीस रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारले जात आहे. वास्तविक हे शुल्क डोंगरात असलेली लेणी पाहणा-र्यांकडून आकारले पाहिजे परंतु तसे न व्होता  सर्रास सर्वांकडून शुल्क आकारले जात आहे त्यामुळे लेण्याद्रीला गिरिजात्मकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व सहली निमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक पैसे मोजावे लागत असून आर्थिक बुदंड सहन करावा लागत आहे. 
  

पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक यांना  जुन्नर येथील शिष्टमंडळ भेटून शुल्क रद्द करण्याची मागणी केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.