Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १७, २०१९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्काराने बेमिराम ब्राम्हणकर सन्मानित




सिंदेवाही- समाजाचा अविभाज्य अंग असलेला मानव विविध स्तरावर काम करीत असतो . शिक्षण आणि समाज यांचा घनिष्ट संबंध आहे .समाजातिल अनेक गुणीजन आपल्या कार्यरत क्षेत्रासोबतच समाजहिताची अनेक कामे अविरत करित असतात .कला ,शिक्षण, साहित्य, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील उपक्रमांमार्फत समाजाला दिशा देण्याचे कार्य अनेकजन  अविरतपणे करीत असतात. अशाच सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव येथील उपक्रमशील शिक्षक बेनिराम रामचंद्र ब्राम्हणकर यांच्या कार्याची दखल नागपूर येथील मदत सामाजिक संस्थेने घेतली. रविवार दि . १५ डिसेंबर २०१९ ला संत गाडगेबाबा सभागृह नागपूर येथे १७ वे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला . शेती, वैद्यक व्यवसाय, लघुउद्योग, समाजकार्य, शैक्षणिक क्षेत्र, साहित्य, संशोधन इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून मदत या सामाजिक संस्थेने पाठीवर थाप दिली. यामुळे आणखी जोमाने काम करण्याचे स्फुरण  चढ्ले. या समारोहात चंद्रपूर जिल्ह्यातून बेनिराम रामचंद्र ब्राम्हणकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा . जोगेंद्रजी कवाडे यांचे हस्ते करण्यात आले.





कार्यक्रमाचे आयोजक मदत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य गण, अन्य मान्यवर उपस्थित होते . दुपट्टा, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी बेनिराम ब्राम्हणकर यांचे सर्वांकडून शुभेच्छांसह अभिनंदन करण्यात येत आहे .बेनिराम ब्राम्हणकर यांनी सदर पुरस्कार वडील रामचंद्र ब्राम्हणकर, आई शकुंतला ब्राम्हणकर व आजी स्व. जमनाबाई ब्राम्हणकर या त्रिशक्तींना समर्पित केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.