Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर २१, २०१९

ढगाळ वातावरणामुळे गव्हावर माव्याचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतित





येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: राजापूर येवला तालुक्याच्या पुर्व भागात आधीच अवकाळी पावसाने खरिपाच्या बरेच पेरण्याचे नुकसान झालेले असतानाच आता शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केलेला आहे व सध्या ढगाळ हवामान जास्त प्रमाणात असल्याने रब्बीचे पीक पूर्णता धोक्यात आली आहे बहुतांशी पेरण्या ह्या मध्ये गहू हरभरा कांदा रांगडा कांदा असे शेतकऱ्यांनी शेतामध्ये सध्या पिके घेतली आहे पण निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांची अडचण मोठ्या प्रमाणावर वाढली आहे कांदा लागवडीपासून शेतकऱ्यांना एक एकरासाठी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येत आहे तरीही शेतकरी अजून  कांदा पिकासाठी मोठी धडपडताना दिसत आहे तालुक्यातील पूर्व भागातील राजापूर ,ममदापुर ,पन्हाळसाठे, पिंपळखूटे, खरवंडी, या भागात पोळ कांदा व रांगडा कांद्याची लागवड झालेली आहे मात्र मागे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी  टाकलेली रोपे पूर्णतः गेल्याने बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकाची लागवड केली असताना भाजीपाल्याला ही भाव नाही व ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पीके घेणे सुद्धा अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्यासाठी हजारो रुपयांच्यावर भुर्दंड सहन करावा लागत असून बहुतांशी सर्व ठिकाणी ढगाळ वातावरणाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.मागे परतीच्या सतत दररोज रिमझिम  पावसामुळे शेतात पाणी  सारखे असल्याने शेतातील कांदा पूर्ण खराब होऊन गेला व आता त्या कांद्याला दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना अवाच्या सवा खर्च करावे लागत आहे एवढे करूनही कांदा जमतो की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे कांदा पीक सावरत असतानाच दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल झाल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने रब्बीच्या हंगामातील पिके पुन्हा विविध रोगांच्या प्रादुर्भावाला बळी पडत असून सर्वसामान्य शेतकरी जास्त भरडला गेलेला दिसून येत आहे यंदा खरीप हंगाम आधीच शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरला होता. आणि आता रब्बी हंगामातील पीक हे ढगाळ हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर खर्चिक ठरला असताना  हंगामातील, कांदा गहू हरभरा व इतर भाजीपाला पिके या पिकांना मोठा फटका बसला रब्बीची तयारी केली व लोकांकडून उधार उसनवारीवर बी बियाणे घेऊन शेतकरीवर्गाने रब्बीच्या पेरण्या केल्या मात्र पुढे निसर्गाचे हवामान बदलामुळे  शेतकऱ्यांनी कृषी दुकानदारांकडून उधार उसनवारीवर गहू हरभरा हे बियाणे आणून पेरणी केली मात्र दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाल्याने ढगाळ वातावरण आणि पहाटेच्या धुक्याने शेतकऱ्यांची सध्याची अवस्था म्हणजे इकडून आड तिकडून विहीर अशी झाली आहे. हे  वातावरण आणखी  राहिल्यास शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होतो की नाही. असा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे शेतकरी हा नेहमी प्रयत्नवादी राहून आपल्या कुटुंबाची देखभाल शेतीवरच अवलंबून असल्याने शेतात राबराब राबून काबाडकष्ट करीत आहे. मात्र शेतकऱ्यांना कधी दुष्काळ कधी ओला दुष्काळ या संकटाने शेतकरी मोठ्या संकटात सापडली आहे .शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरा आधार नाही येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागातील भवितव्य हे ये कपाशी पोळ कांदा रांगडा कांदा यावर अवलंबून आहे परंतु कपाशीला बाजार नाही कांद्याला बाजार आहेत तर कांदा नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन हे  अवघड झाले आहे .शेतकऱ्यांचा खर्च हा या वर्षी रासायनिक खते महागडी औषधे हे यावर मोठ्या प्रमाणात झाला असल्याने शेतकरी या संकटामुळे हैराण झाले आहे. घरातील आजारपण मुलांचे शिक्षण लग्नकार्य या सर्व गोष्टी शेतकऱ्यांच्या या शेतीवर अवलंबून असतात आता मजुरी खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना शेतातील कामे मजुरी ही दोनशे रुपये झाली असल्याने मंजूरी करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत शेतकऱ्यांची आर्थिक बजेट कोलमडले आहे. गहू व कांदा ही पिके रोगट हवामानामुळे खराब होत आहे सध्या काही ठिकाणी कांद्याची लागवड होत असून कांद्याला भाव मिळत असल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कसरत सुरु आहे बदलणारे हवामानामुळे कांद्याचे उत्पन्न घटले आहे उत्पादन कमी झाले असल्याने कांद्याच्या लागवडीत रासायनिक खते मजुरी आदींचा खर्च हा भरमसाठ झालेला आहे यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटाचा सामना करीत आहे. गेल्या काही वर्षापासून राजापूर व परिसरात दुष्काळाशी सामना मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर केलेला असताना एक रुपयेही उत्पन्न मागील वर्षी निघाले नाही यावर्षी काही प्रमाणात पाऊस होऊन उत्पन्न निघेल अशी शेतकर्‍यांना आशा होती पण परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडले आहे शेतकरी ची अवस्था ही ही आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडलेली आहे आहे. गव्हावर मावा व गहू पिवळे पडत असल्याने फवारणी केल्याशिवाय पर्याय राहिला नाही ्यामुळे आणखीन शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे कृषी विभागाने  शेतकऱ्यांना ढगाळ हवामानामुळे कोणत्या पिकावर काय फवारणी करावी याविषयी प्रत्येक गावांमध्ये मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात यावी अशी मागणी होत आहे.

मागे परतीच्या पावसाने दहा ते पंधरा पाईल्या रोपे  टाकले होते पाऊसाने खराब होऊन गेले आहे.आता कांदा लागवड करण्यासाठी रोपे नसल्याने कांदा लागवड कमी झाली आहे. 
- अनिल अलगट शेतकरी राजापूर
"सध्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी वर्ग  मोठ्या प्रमाणावर संकटाचा सामना करावा लागतो आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे तेव्हा शेतकऱ्यांची प्रगती होईल".
- समाधान चव्हाण शेतकरी राजापूर

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.