Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर ०४, २०१९

प्राचीन रोकडोबा हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा



येवला प्रतिनिधि / विजय खैरनार
येवला तालुक्यातील गारखेडा येथे प्राचीन रोकडोबा हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने गावातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांचे प्रवचन झाले. ह.भ.प. सुभाषजी महाराज, ह.भ.प. गोपालनंदगिरीजी महाराज यांचे कीर्तन झाले. मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी, महापूजन, होम, बलिदान, महानवैद्य, महाआरती ह.भ.प हरिशरण गिरीजी महाराज यांचे हस्ते झाले. वेदमूर्ती विजय पाठक आणि निलेश पाठक यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले. 

अनेक वर्षापासून जीर्ण झालेला हनुमान मंदिराचे काम हे कित्येक वर्षापासून मागे पडले होते तरी गावकरी यांनी एक मतानी सर्वानी निश्चय करुण मनावर घेऊन एक वर्षापासूनकाही व्यक्तिने काही जब धरून त्याला काल यश आले गावातील मंडळीने आपल्या प्रत्येक घरातून आपल्या शेती नुसार चांगल्याप्रकारे गावातील हनुमान मंदिराला मोठी देणगी देऊन कित्येक वर्षापासून जुन्या काळाचे रोकडोबा हनुमान मंदिर याचे नवीन मुहूर्त पाहुन पूजा विधि तीन दिवस असे सलग करून मोठ्या जल्लोषात मिळून गाजून काल प्राणप्रतिष्ठा पार पाडला आहे तसेच सर्व ग्रामस्थांना भोजनाचा देखील लाभ दिला आहे पन्यास लाख रुपये इतका खर्च या मंदिरात झालेल्या असून सर्व गावकरी तसेच तालुक्यातील मोठ्या नेत्यांनी याला हातभार लावलेला आहे चांगल्या प्रकारे सहकार्य करून मंदिराचा काम आज पूर्ण करून मोठं आनंदमय वातावरण असं भव्य दिव्य गावात मंदिर झालेला आहे शेवटच्या दिवशी दहा ते बारा महंत रामगिरीजी महाराज सरला बेट यांच्या हस्ते प्रतिमापूजन अभिषेक सकाळी करुण त्यानंतर एक वाजता काल्याचे कीर्तनात बाबा म्हंटले की आपण हनुमंताचे दर्शन दररोज घेतले पाहिजे, त्यामुळे आपले जीवन सार्थक होते. हनुमानाच्या मंदिराने गावात सुख-शांती लाभते. हनुमंताची मूर्ती म्हणजे गावाचे वैभव असल्याचे सरला बेटचे म्हंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.




गावातील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले रावसाहेब खैरनार ,भिवराज खैरनार ,नाना खैरनार ह.भ.पा.रामनाथ महाराज गारखेडेकर ,विजय खैरनार ,शिवाजी मगर ,गोरख खैरनार ,आप्पासाहेब खैरनार ,प्रकाश मगर रायभान खैरनार ,राधु खैरनार ,अंबादास खैरनार किसन खैरनार ,कैलास खैरनार ,कानू खैरनार ,राजू खैरनार ,भागिनाथ खैरनार ,सूर्यभान खैरनार ज्ञानेश्वर खैरनार ,भास्कर महाले ,चांगू खैरणार कारभारी गायकवाड ,बाबासाहेब निकम ,बाबुराव खैरनार ,प्रकाश खैरनार ,लक्ष्मण मगर ,नामदेव मगर ,माधव मगर तसेच उपस्थित पंचक्रोशीतील भजनी मंडळ गाव गारखेडे तळवाडे डोंगरगाव पिंपळकुटे अंगुलगाव पांजरवाडी सायगाव  धामणगाव अंदरसुल गवंडगाव देवळाणे बोकटे  दुगलगाव सुरेगाव देवठाण आदींनी सहकार्य केले सर्व पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.