चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती नाही - मुख्यमंत्री
नागपूर/ प्रतिनिधी
तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येईल - मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील विकासकामांचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी नागपूरात आयोजित बैठकीत आढावा घेतला.
गृहमंत्री एकनाथ शिंदे, सार्व.बांध.मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, बंटी भांगडिया, प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांना कोणतीही स्थगिती दिली नसून प्रगतीपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
चंद्रपूरसह, गडचिरोली,गोंदिया नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे