Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २८, २०१९

थकीत पाणीकर वसुलीचे आयुक्तांचे निर्देश

                     

      थकीत मालमत्ता कर व पाणीकराचा भरणा करण्याचे मनपातर्फे आवाहन
चंद्रपूर २८ नोव्हेंबर -  मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे कडक निर्देश महापालिका आयुक्त श्री. संजय काकडे यांनी २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या पाणीकर व मालमत्ता कर वसुली आढावा सभेत दिले. बुधवारी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना आयुक्त यांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीचा आढावा घेतानाच वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे व विशेष वसुली मोहीम राबविण्याबरोबरच वेळप्रसंगी कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.



    शहरातील पाण्याची गरज लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेने २०११ रोजी उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनी बरोबर शहराला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा करार केला होता मात्र कंत्राटदाराकडून करारनाम्यातील अटींचे वारंवार उल्लंघन होणेदेय रकमांचा भरणा न करणेशहराचा पाणीपुरवठा सुरळीत न करता वारंवार अडथळे निर्माण करणेमनपाच्या आदेशाचे पालन न करणे या सर्व कारणांच्या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीपुरवठा मनपातर्फे ताब्यात घेण्यात आला असून पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करण्यास मनपा प्रयत्नशील आहे.
    दरम्यान महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होणाऱ्या पाइपलाइनमधून मोटार पंपाच्या माध्यमातून पाणी उपासण्याचे प्रकार आढळून आल्यास मोटार जप्तीची कारवाई मनपातर्फे राबविण्यात येणार आहे. शहरातील थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना  संबंधित बैठकीत देण्यात आल्या. पाणीपुरवठा खंडीत करण्याची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनीं वेळेच्या आत थकीत रकमेचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
     याप्रसंगी  उपायुक्त श्री. गजानन बोकडेसहायक आयुक्त श्री. धनंजय सरनाईकशीतल वाकडेसचिन पाटीलशहर अभियंता श्री. महेश बारईश्री. मनोज गोस्वामीउपअभियंता श्री. विजय बोरीकरअधिकारीकर विभाग व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.