चंद्रपूर/प्रतिनिधी:
कडाक्याच्या थंडीने चार भिंतीत राहणारे चंद्ररपूरकर तर गारठलेच मग झोपडपट्या मध्ये राहणाऱ्यांचे काय? माणुसकीच्या भावनेतून याचाच विचार करून चंद्रपूर येथील, चांदागड यूथ फाऊंडेशन तर्फे जागतिक बालदिन तसेच पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्ताने गरीब गरजूंना ब्लँकेट तसेच लहान मुलांना वही व पेन वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ह्या कार्यक्रमात शहरातील विविध भागात जाऊन उघड्यावर झोपणाऱ्या गरिबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले, शहरातील साईबाबा मंदिर, नागपूर रोड रेल्वे स्थानक, बस स्थानक, बागला चौक, तसेच महाकाली मंदिर येथे वाटप करण्यात आले. ह्या वेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष मा. इशान नंदनवार, उपाध्यक्ष लिखिल देवतळे, तसेच लुमिता नागपुरे, रुबिना शेख, शशांक मोहरकर, अमित सोनटक्के, अमित नामेवार, कुणाल डांगे, शुभम दिवसे, विवेक पोद्दार, अभिजित, सागर, प्रतीक, सोम, आकाश येंडे, जमिर, अक्षय, अश्विनी चहारे, दिव्या व मेघा ह्यांची उपस्थिती होती.
रात्री रोडवर बरेच गरिब व गरजू लोक असतात त्यांना आंथरुन, पांघरुन व स्वेटर वितरीत करण्याचे काम यावेळी चांदागड यूथ फाऊंडेशन तर्फे केल्या गेले. याकरिता संस्थेच्या आवाहनाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मोठे सहकार्य केले.
या कार्यक्रमा मुळे वाढत्या थंडी पासून वाचण्या करिता गरजूंच्या मदतीस आपला हातभार लागावा ही इच्छा मनात घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले.