Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर १५, २०१९

चंद्रपूर:बिबट शिकारप्रकरणी 4 आरोपींना अटक



चंद्रपूर/ललित लांजेवार:
मध्य चांदा वनविभागा अंतर्गत बल्हारशाह परीक्षेत्रातील किन्ही बिटातील मिश्र रोपवन 2018 कक्ष क्रमांक 569 मध्ये दिनांक 13/11/2019 ला फास्याच्या सहाय्याने बिबट्याची शिकार करण्याच्या प्रयत्नामुळे वन्यप्राणी बिबट फास्यात अडकून मृत पावला. सदर फासे लावणे प्रकरणी वनविभागाने आज दिनांक 15/11/2019 रोजी न शिकारीचे साहित्यासह 
1) दामोधर पैकन टेकाम, रा.किन्ही वय 70 वर्ष 2) श्रावण. खटरु आत्राम, रा. किन्ही वय 45 वर्ष . 3) रमेश किसन गेडाम रा. किन्ही वय 35 वर्ष
4) एकनाथ विठोबा झाडे रा. किन्ही वय 51 वर्ष यांना अटक केली आहे.वनविभागाने वनगुन्हयात वापरलेली अवजारे व जाळे जप्त केले असून आरोपी श्रावण. खटरु आत्राम, रा. किन्ही वय 45 वर्ष .व एकनाथ विठोबा झाडे रा. किन्ही वय 51 वर्ष हे वनविभागाचे रोजंदारी रोपवन चौकीदार आहेत. 
 बिबट्याची शिकार झाल्याचे वनविभागाने भाजप पदाधिकार्यांच्या दबावाखाली माध्यमांपासून लपविले असल्याचा आरोप विरोधकांनी सोशल मिडीयावर केला होता, मात्र वनविभागाने २ दिवसात आरोपींना अटक  केली.



यांना अटक करुन वनगुन्हा क्रमांक 257/22 दिनांक 13/11/2019 वन्यजीव (संरक्षण), 1972 चे कलम 2,9,39,51 अन्वये वनगुन्हा नोंद करुन न्यायालयात दाखल करण्यात आले.पुढील तपास गजेंद्र हिरे, उपवसंरक्षक मध्य चांदा वनविभाग,चंद्रपूर व प्रितमसिंग कोडापे, सहा. वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनात संतोष थिपे, वनपरीक्षेत्र अधिकारी बल्हारशाहे हे करीत आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.