जोरगेवारांच्या सभेला हाऊसफुल गर्दी
चंद्रपुर/प्रतिनिधी:
सामाजीक क्षेत्रात काम करतांना अनेक अडचणींचा मला सामना करावा लागला. अनेकदा माझ्यावर अन्याया झाला. जेव्हा जेव्हा माझ्यावर अन्याय होतो तेव्हा तेव्हा अन्याय करणा-यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे.
अन्यायाविरोधात संघर्ष करा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द मला आठवतात त्यातून मला संघर्ष करण्याची हिंमत मिळते. चंद्रपूरकरांनीही अन्याय कधीच सहन करायचा नाही, असे आवाहन किशोर जोरगेवार यांनी केले. आज गांधी चौक येथे आयोजित विशाल जन आर्शिवाद सभेला संबोधीत करतांना ते बोलत होते. यावेळी, डॉ. शफीक अहमद साहेब, अध्यक्ष, सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट, चंद्रपूर, राजेंद्रजी वैद्य, महाराष्ट्र प्रदेश राष्टवादी कॉंग्रेस पार्टी सहसचिव दिपकजी दापके, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. सुरेश महाकुलकर, मनपा गटनेता कॉंग्रेस पार्टी प्रा. सुर्यकांत खनके, माजी अध्यक्ष सेवादल कॉग्रेस सुधाकर कातकर, माजी महासचिव जिल्हा कॉग्रेस कमेटी चंद्रपूर शशीकांतजी देशकर, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, विशालजी निंबाळकर शिवसेना नगरसेवक मनपा, चंद्रपूर अमजद अलीए कॉग्रेस नगरसेवक मनपा चंद्रपूर, संजयजी वैद्य, माजी नगरसेवक राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, बलरामजी डोडानी, माजी भाजपा नगरसेवक मनपा, चंद्रपूर श्री. लक्ष्मणजी ढोबे, माजी नगरसेवक मनपा, चंद्रपूर चंद्रमा यादव, इंटक नेते दयालालजी कन्नाके, आदिवासी समाजाचे नेते अन्वर अली, अजयजी जयस्वाल, वरिष्ठ नेते भारतीय जनता पार्टी गणपतरावजी सत्रे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विवेक आंबेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रा. श्यामजी हेडाऊ, संगीता भोयर, नगरसेविका मनपा चंद्रपूर, अशोक मत्ते आदिंची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी, पूढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, दारु बंदीनंतर हजारो लोकांच्या हातचा रोजगार गेला त्यांच्या पुर्णवसनाचा प्रश्न आजही कायम आहे. मात्र, यावर एकही शब्द बोलायला कोणी तयार नाही. चंद्रपूरात ड्रग्स सारख्या जिवघेण्या अमली पदार्थाने डोके उंचावले आहे.
यात तरुण पिढी नशेच्या आहारी सापडली आहे. व्यसनमूक्तीकरीता प्रशासनाने कोणतेही काम केले नाही. 21 हजार घरकुलांचा प्रश्न आजही प्रलंबीत आहे. या लोकांनाही न्याय मिळवून द्यायचा आहे. फक्त सौदर्यीकरणालाच विकास म्हणून न स्वतःची पाठ थोपटवून घेण्याचे काम केल्या जात असून चंद्रपूरातील मूळ प्रश्न तसेच रेंगाळत असल्याचा आरोप यावेळी बोलतांना अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी केला
मागील 25 वर्षापासून भाजपच्या लोकप्रतिनीधींची सत्ता आहे, असे असूनही विकासाच्या नावावर चंद्रपूरकरांची दिशाभूल करण्याचे काम केल्या जात आहे. ज्या गोष्टीची मागणीच कोणी केली नाही. त्या गोष्टी केल्या जात आहे. जटपूरा गेटची वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी न लावता त्या ठिकाणी करोडो रुपये खर्च करुन तेथे सोदर्यीकरण करण्यात आले. मात्र, येथील सौदर्यीकरन अद्याप तरी चंद्रपूकरांच्या नजरेस पडलेला नाही.
कधीकाळी रोजगार देणारा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातच आता बेरोजगारीने थैमान घातला आहे. सुशीक्षीत तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे त्यांचा ही रोजगार हिरावल्या जात आहे. दारु बंदीनंतर हजारो लोकांच्या हातचा रोजगार गेला त्यांच्या पुर्णवसनाचा प्रश्न आजही कायम आहे. मात्र, यावर एकही शब्द बोलायला कोणी तयार नाही. चंद्रपूरात ड्रग्स सारख्या जिवघेण्या अमली पदार्थाने डोके उंचावले आहे.
यात तरुन पिढी नशेच्या आहारी सापडली आहे. व्यसनमूक्तीकरीता प्रशासनाने कोणतेही काम केले नाही. 21 हजार घरकुलांचा प्रश्न आजही प्रलंबीत आहे. या लोकांनाही न्याय मिळवून द्यायचा आहे. फक्त सौदर्यीकरणालाच विकास म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेण्याचे काम केल्या जात असून चंद्रपूरातील मूळ प्रश्न तसेच रेंगाळत असल्याचा आरोप यावेळी बोलतांना अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी केला. चंद्रपूरात विकासाच्या मोठ्या बोंबा करणारे पाणी प्रश्नावर एक शब्द बोलत नाही. चंद्रपूरात मानवनिर्मीत पाणी टंचाई निर्माण झाली असतांना स्थानीक आमदार बेपत्ता होते.
आम्ही यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून टॅंकरद्वारे पाणी पूरवठा केला. मात्र, सुडबुध्दीने आमच्या टॅकर बंद करण्याचे पाप महानगरपालिकेने केले. बाबूपेठ उडाण पुलाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबीत होता, आमच्या अभूतपुर्व आंदोलनानंतर हा विषय मार्गी लागला तेथे पूलीयाचे काम सुरु करण्यात आले. मात्र, ते कामही अतिशय मंद गतिने सुरु आहे. प्रदुशानाचाही विषय मोठा आहे. चंद्रपूरकरांचे 5 ते 10 वर्ष आयुमान या प्रदुशनामूळे कमी होत आहे, असा डॉक्टरांचा रिपोर्ट आहे. या गंभिर विषयांकडे कोणाचे लक्ष नाही.
चंद्रपूरच्या सभोवताल चार नद्या असूनही आपण स्वतःचा पाण्याच स्त्रोत तयार करु शकलो नाही. हे स्थानीक लोकप्रतिनींधीच्या निष्क्रियतेचे मोठे उदाहरण आहे. असेही ते यावेळी म्हणाले. दोनही प्रमूख पक्षाने स्थानीक उमेदवाराला उमेदवारी नाकारल्याने चंद्रपूकरांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे, चंद्रपूर हा अन्याया विरोधात संघर्ष करणारा जिल्हा असून आजवर अनेक मोठे नेतृत्व जिल्ह्याने देशाला आणि राज्याला दिले आहे. असे ते यावेळी बोलले.
मी नागरिकांसाठी केलेले आंदोलन त्यांच्या समोर आहे. मी केलेल्या कामावर तुम्हाला मत मागण्यासाठी आलो आहे. मला खरा विकास काय आणि कसा असतो ते राज्याला दाखवायचे आहे आणि ते मी करुन दाखणारच अशी ग्वाही किशोर जोरगेवार यांनी दिली. या अभुतपुर्व सभेला हजारो चंद्रपूकरांची उपस्थिती होती.
लावरे तो टिव्ही
आजच्या सभेत किशोर जोरगेवार यांनी लाव रे तो टिव्ही म्हणत सरकारी रुग्णालय, पाणी टंचाई, वरोरा नाकापुलीया यासह विविध कामातील सत्य व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला दाखवले त्यांच्या लाव रे तो टिव्ही ला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला