नागपूर/प्रतिनिधी:
एकेकाळी रोजगार मिळवून देणारा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख होती. मात्र आता बाहेरुन कामगार आणून चंद्रपूर जिल्हातील कामगारांना डावलल्या जात आहे. त्यामूळे जिल्ह्यातील यूवक बेरोजगारीमूळे जिल्ह्यातून पलायन करत आहे.
हा अन्याय आपण कधीही सहन करणार येथील युवकांना पहिले प्राधाण्य दिल्या गेले पाहिजे हि आपली भुमीका असून स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी सर्वोपरी प्रयत्न करील अशी ग्वाही किशोर जोरगेवार यांनी दिली. आज शुक्रवारी विविध क्षेत्रातील कामगारांनी किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांना पांठिबा दिला यावेळी ते बोलत होते.
चंद्रपूरात बेरोजगारीने थैमाण घातले आहे. यातच अनेक उदयोगधंदे बंद पडत असल्याने होते त्यांचा रोजगार ही हिरावल्या जात आहे. कामगार क्षेत्रात लागलेल्या या ग्रहणाला कंटाळून अनेक सुशिक्षित युवक रोजगाराच्या शोधात चंद्रपूरातून पलायन करीत आहे. दरम्यान आज शुक्रवारी विविध क्षेत्रातील अनेक कामगारांनी किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात जोरगेवार यांची भेट घेऊन विधानसभेच्या लढाईत जोरगेवार यांना जाहिर केला आहे. किशोर जोरगेवार हे अनेक वर्षापासून स्थाणिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी संघर्ष करीत आहे.
या संघर्षातून त्यांनी मायनिंग सरदार च्या 333 जागा प्रशासनाला भरायला भाग पाडल्यात त्यांच्या नागपूर सिएसी कार्यालयावरील मोर्चा मूळे 333 युवकांना रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांनी स्थाणिकांना रोजगार मिळावा याकरिता वेळोवेळी आंदोलने केली आहे. परिणामी कामगार क्षेत्रातील कामगारांचा जोरगेवार यांचेकडे कल दिसून येत आहे.
सिएसटीपीएस, धारीवाल व महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न जोरगेवार यांनी मार्गी लावले आहे. याचाच परिणाम म्हणून आज विविध क्षेत्रातील कामगारांनी जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांना आपला जाहिर पाठिंबा दिला आहे. यावेळी जोरगेवार यांनी कामगार क्षेत्राकडे दुर्लक्ष करुन समाजाचा विकास ही संकल्पणा चुकीची असल्यांचे सांगत कामगार क्षेत्रात कामगारांवर होत असलेल्या अन्याया विरोधात तिव्र भुमीका घेईल, असे आश्वासन जोरगेवार यांनी दिले