ललित लांजेवार/नागपूर:
यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले किशोर जोरगेवार यांना काँग्रेस पक्षाने चंद्रपूर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज किशोर जोरगेवार अपक्ष लढणार असल्याचे पक्के झाले आहे.
भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या व नंतर स्वतंत्र होंत काँग्रेसवासी झालेल्या यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले किशोर जोरगेवार यांनी सोमवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.या प्रवेशामुळे जोरगेवार यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याचे जवळपास निश्चित झाले होते.मात्र फार्म भरायला 2 दिवस शिल्लक असतांना काँग्रेसन तिकीट ही पार्सल उमेदवार महेश मेंढे यांना दिली.
विशेष म्हणजे मागील दोन टर्म पासून भाजप आमदार नाना श्यामकुळे व काँग्रेसचे सध्याचे उमेदवार असलेले महेश मेंढे हे दोघेही पार्सल उमेदवार आहेत.
उमेदवारांच्या दोन याद्या काँग्रेसने जाहीर केल्यानंतर देखील या दोन्ही यादीत किशोर जोरगेवार चंद्रपूर यांचा उल्लेख नसल्यामुळे जोरगेवार यांचे चाहते नाराज झालेले होते
मोठ्या हौसेने काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या किशोर जोरगेवार हे दिल्लीत तीन दिवस तळ ठोकून बसल्यानंतर निराश होऊन चंद्रपूर परतले.त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी बातचीत केल्यानंतर अपक्ष उमेदवार अर्ज भरण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी ते आपला अपक्ष अर्ज भरण्यासाठी दुपारी 12 वाजता जिल्हाहाधिकारी यांच्या कार्यालयात जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले.
खासदार धानोरकर व आमदार वडेट्टीवार हे दोघेही जोरगेवार यांच्यासाठी आग्रही आहेत मात्र पक्षश्रेष्ठी यांचे कान कोणीतरी फुकले असल्यामुळे जोरगेवार यांचे नाव यादीत आले नाही.
काँग्रेसला महेश मेंढे यांना जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे भाजप आमदार नाना श्यामकुळे यांचा मार्ग सुखकर झालेला आहे. तर उमेदवारी नाकारल्याने अस्वस्थ असलेल्या किशोर जोरगेवार यांनी अबकी बार किशोर जोरगेवार म्हणत अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
त्यामुळे या साडे माडे तीन उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्यावरच मतमोजणीच्या दिवशी निकालानंतर यांचं भवितव्य काय असणार आहे.ही त्यावेळची वेळच सांगणार आहे