Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर २६, २०१९

हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात;२ जवान ठार


ललित लांजेवार/नागपूर:
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात 



चंद्रपुरहुन नागपुरला जात असताना हा अपघात



या अपघातातून अहिर थोडक्यात बचावले, मात्र सीआरपीएफच्या वाहनातील दोघांचा मृत्यू 

चंद्रपूर-नागपूर महामार्गाहून पुढे जाताना तांडळी पूल पार केला. त्यानंतर अहिर पुढे गेल्यावर मागच्या ताफ्यातील वाहनाची कंटेनरला धडक बसली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात ठार झालेल्यांत गाडीचा चालक विनोद विठ्ठल झाडे (३७) रा . चंद्रपूर व सीआरपीएफचा जवान फलजीभाई पटेल यांचा समावेश आहे.


चालक मनोज झाडे (चंद्रपूर), एएसआय विजयकुमार, फलजीभाई पटेल, एम.जी. साजिद, जयदीपकुमार, प्रकाश भाई आणि बनवारीलाल रेगट (सर्व सीआरपीएफ) असे सातजण त्या गाडीत होते. 







SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.