घरांच्या पट्ट्यासाठी श्रमिक एल्गारचा सिंदेवाही तहसील कार्यालयावर मोर्चा
सिंदेवाही/प्रतिनिधी
आमदाराने स्वतःची पाच मजली इमारत उभी केली. मात्र, गरिब नागरिकांना अजूनही घरकूल मंजूर करण्यात आले नाहीत. निधी खेचुन आणणारे आमदार घरकुलाच निधी खेचुन आणावा. मात्र तसे न करता केवळ सिंदेवाही तहसिल गळते म्हणुन तहसिल कार्यालयाच्या बांधकामासाठी चौदा कोटी मंजुर केले. यामुळे सामान्य जनतेला काय फायदा असा प्रश्नही उपस्थित करीत श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांनी आमदारावर नाराजी व्यक्त केली.
सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही, सिंदेवाही शहर, जाटलापूर तुकूम येथील अनेक नागरिकांना घराचे पट्टे नसल्यामुळे त्यांना घरापासून घरकुला पासून वंचित राहावे लागत आहे. अशा गरजू कुटुंबीयांना तातडीने घराचे पट्टे आणि घरकुल मंजूर यावी अशी मागणी श्रमिक एल्गार च्या अध्यक्ष अॅङ. पारोमिता गोस्वामी यांनी तहसीलदारांकङे केली.
श्रमिक एल्गारच्या वतीने सिंदेवाही येथील जुना बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत महिलांचा मोर्चा काढण्यात आला यावेळी सिंदेवाही शहर, लोनवाही, जाटलापुर तुकूम येथील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या तिन्ही गावातील नागरिकांना घराचे पट्टे नसल्याने घरकुला पासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्याचे घर नसल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे पावसाचे दिवस सुरू असल्याने गैरसोय होऊ शकते यासंदर्भात तहसील आपल्याकडे अनेकदा निवेदने देऊन मागणी रेटून धरण्यात आले होते मात्र अद्यापही त्यावर कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे मोर्चा काढून याकडे शासनाचे लक्ष वेधले जाटलापुर येथील शेकडो नागरिक मागील तीस चाळीस वर्षांपासून वास्तव्यास आहेत सदर अतिक्रमण जागेचा शासनाकडे नियमाप्रमाणे दंड भरीत आहेत मात्र घराचे पट्टे नसल्याने तसेच त्यांचा सिटीसर्वे न झाल्याने विकास आराखडा रखडलेला आहे ही बाब यावेळी एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांनी तहसीलदारांचे निदर्शनास आनुन दिले.
या मार्चात श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, महासचिव घनशाम मेश्राम, आमआदमी पार्टिचे मनोहर पवार, भिवराज सोनी, बबन क्रिष्णपल्लीवार, संदिप पिंपळकर, विनायक गजभिये, सामाजिक युवा ब्रिगेडचे अमोल निनावे, सिंदेवाही तालुकाध्यक्ष शशिकांत बतकमवार, संगिता गेडाम, शांताराम आदे, देवनाथ गंडाटे, शहनाज बेग, कुंदा गेडाम, शितल वाडगुरे, शारदा खोब्रागडे, शुभम येरमे, ओमकार कोवे, अजय गेडाम, विलास नाने, प्रमोद गावडे, खुशाल कन्नाके, खूशाल कन्नाके, पुरुषोत्तम सिडाम यासह शेकडो नागरीक मोर्चात सहभागी होते.