१८ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ
चांपा/प्रतिनिधी:
चांपा ग्रामपंचायत येथे तहसिल कार्यालय उमरेड यांच्या सौजन्याने प्रधानमंत्री किसान मानधन योजनाचे शिबिर ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी ३वाजता आयोजित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनाचे शिबिरचे उदघाटन सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी उपस्थितीत पाचगावचे मंडळ अधिकारी भूरे , तलाठी प्रियंका अलोने , मुंढरे , शेंडे , उमरेडचे कृषि अधिकारी व कृषि सहायक अधिकारी गुड, नागरे , कोतवाल ऊके , रोशन हरडे , कॉम्प्युटर ऑपरेटर आशिष कुरडकर, आनंद तुळसकर आदींच्या उपस्थितीत प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनांचे शुभारंभ करण्यात आले .यावेळी शेतकरी गोपाल किसन आदे, चंद्रभान परतेकी , आदी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान मानधन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले .सोबतच किसान कार्डचे वाटप करण्यात आले .
शिबिर २३ते २५पर्यंत ग्रामपंचायत कार्यालय येथे चांपा परिसरातील हळदगाव , परसोडी , तिखाडी , उमरा, दुधा, पेंढरी , सुकळी , चांपा , मांगली , खापरी , उटी , भिवापुर आदी गावातील शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त संख्येत चांपा येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक २३ते २५ तारखेपर्यंत सकाळी ११वाजता ते ५वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय चांपा येथे शेतकरी किसान कार्ड बनवण्यात येणार असून चांपा परिसरातील सर्व शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच अतिश पवार यांनी केले आहे.