ललित लांजेवार/चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत बिबट शिरल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील सावरी येथील जिल्हा परिषद शाळेतील बाथरुममध्ये हा बिबट घूसला होता,सकाळी ११ वाजताच्या दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक राजू बलकी हे बाथरुममध्ये गेले असता ते बिबट बघून घाबरले,आणि आरडा ओरड सुरु झाली.शाळेतल्या बाथरूमध्ये असल्याची माहिती त्यांनी सर्व शिक्षकांना सांगितली,तो परियंत बाथरूमचा दरवाजा बंद करण्यात आला होता, शिक्षकांनी तातडीने हि बाब वन अधिकाऱ्यांना सांगितली.घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी दाखल होत बिबट्याला अथक परिश्रमानंतर जेरबंद करण्यात आले.
या घटनेची माहिती गावात होताच शाळेच्या भोवताल चांगलीच गर्दी जमली,लोक झाडावर चढून बसून बिबट बाहेर येण्याची वाट बघू लागले,मात्र हाच बिबट जर शाळेच्या वेळ आला असता किव्हा बाथरूम व्यतिरिक्त अन्य ठिकाणी दडून बसला असता तर एखादा जीव नक्कीच गेला असता,या घटनेमुळे आता जंगल परिसरातील सर्व शाळेतील परिसराला पक्क्या कुंपणाची आवश्यकता निर्माण झाली असून पक्के भिंतींचे उंच कुंपण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.