चांपा/प्रतिनिधी:
ग्लोबल वार्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्षलागवड , संगोपन , संवर्धनाने पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे .वृक्ष लागवडीने
वनक्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने शासन स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड अभियानांतर्गत यंदाच्या वनमहोत्सवास सोमवारी पासून उमरेड तालुक्यात वृक्षलागवडीने प्रारंभ झाला .
राज्यात पन्नास कोटी वृक्षलागवडीनुसार वडीसाठी धोरणात्मक आराखड्यानुसार यंदा ३३कोटी वृक्षलागवडीच्या यशस्वीतेसाठी जुलै ता .एक ते सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहेत .उद्दिष्टाच्या तुलनेत उमरेड तालुक्यात राज्य शासनाच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी वनविभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वनमहोत्सवाला उत्तर उमरेड परीक्षेत्रापासून वृक्ष लागवडीचा प्रारंभ झाला .
यावेळी उत्तर उमरेड परिक्षेत्रात एकूण ३ लक्ष २९ हजार १४५ वृक्षलागवडीचा संकल्प उत्तर उमरेड वनपरिक्षेत्र अधिकारी ए .के .मडावी यांच्या मार्गदर्शनात ३०सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे . उटी रोपवन कक्ष क्रं ४०३ मध्ये एकूण १८हेक्टर वनजमिनीवर आजपासून वृक्षलागवडीस सुरवात झाली .
अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण जिल्हापरिषद सभापती पुष्पाताई वाघाडे होते .उत्तर उमरेड परीक्षेत्रात आज उटी रोपवन कक्ष क्रं ४०३-एकूण १८हेक्टर वनजमिनीवर वनविभागाच्या सहकार्याने मान्यवरांच्या हस्ते झाडे लावण्याचा शुभारंभ करण्यात आला .यात अमलतास , सागवन, आपटा , बेल , गुलमोहर , जांभूळ , चाफा , बकुळ, कडुलिंब , जाकरडा, कदंब , निलगिरी आदी प्रकारच्या झाडांचे रोपण करण्यात आले .याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चांपा येथील सरपंच अतिश पवार होते .उत्तर उमरेड वनपरिक्षेत्र अधिकारी ए .के .मडावी, सोबतच मकरधोकडाचे वन क्षेत्र सहायक आर .एम .मेश्राम , वनरक्षक एम .के कुथे, के .पी .लांबधरे ,पी . आर .ननावरे , ए. ए.मेश्राम , वनमजूर बि .एस .पाल , व्ही. आर .ठाकरे , व्ही .डी .चौधरी , एम .एस .बावणे आदींच्या उपस्थितीत वृक्षलागवडीचा कार्यक्रम पार पडला .