१५००० वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प
नाशिक/प्रतिनिधी:
१ जुलै रोजी नाशिक औ. वि. केंद्र, एकलहरे येथील वसाहतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमांतर्गत नाशिक औ. वि. केंद्र, एकलहरे व्यवस्थापनाद्वारे एकूण १५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट १ ते ७ जुलै 'राष्ट्रीय वृक्षरोपण' सप्ताहा निमित्ताने करण्यात आले आहे.
वन महोत्सवाचे औचित्य साधून वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांचे अध्यक्षतेखाली वृक्ष लागवडीचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला. या करीता जनलक्ष्मी बँकेजवळील टि.एस.एफ. सेक्टरमागील मोकळ्या जागेत विविध प्रकारचे रोपे लावण्यात आली.
विशेष बाब म्हणजे वीज केंद्राच्या स्थापत्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंम प्रेरणेने विभागातच विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची सुसज्ज अशी रोपवाटीका तयार करुन त्याची निगा राखली. याच रोपवाटीकेतील रोपे वृक्षारोपणाच्या ठिकाणी लावुन त्यांचे संगोपन केले जाणार आहे.
त्यानुसार यावर्षी लावण्यात येणाऱ्या रोपांमध्ये शेवगा ८२००, विलायती चिंच १४००, आंबा १८०, फणस १५००, सिताफळ ८००, करंज १०००, आंबट चिंच ५५०, जांभुळ ८००, व इतर बेल, बेहडा, गुलमोहर, वड आदी ५७० अशी एकुण १५ हजार झाडांचे संगोपन करण्यात येणार आहे.
आज कार्यक्रमाचे निमित्त वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे उमाकांत निखारे यांनी कार्यक्रमाची फीत कापून रोपाची लागवड करून उदघाटन केले. आज पहिल्या टप्प्यात एकूण उद्दिष्टापैकी ४४३२ वृक्ष लावण्यात आले. तसेच अधिकारी मनोरंजन केंद्र,एकलहरे कार्यकारणी द्वारे विविध फळ व फुल झाडे लावून मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला.
वीज केंद्राचे अधिकारी यांचे हस्ते क्लबच्या मागील मोकळ्या जागेत रोपे लावली.
कार्यक्रमा करीता उपमुख्य अभियंता (संवसु) मोहन आव्हाड, प्र. उपमुख्य अभियंता(प्रशासन) राकेशकुमार कमटमकर, अधिक्षक अभियंता मनोहर तायडे, शशांक चव्हाण, सर्व विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता, अधिकारी, अभियंते, कर्मचारीवृंद, सर्व कामगार संघटना प्रतिनिधी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार, व्ही एन नाईक शिक्षण संस्था, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद, वसाहतीमधील रहिवाशी मोठया संख्येने सक्रिय सहभाग नोंदवून उपस्थिती दिली.
वनमहोत्सव साजरा करण्यासाठी स्थापत्य विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक मोरे व त्यांचे विभागातील कर्मचारीवृंद सहकाऱ्यांनी यशस्वी नियोजन करून परिश्रम घेतले.