नागपूर/प्रतिनिधी:
लहान मुलांसाठी स्मार्टफोन आता जीवघेणा ठरू लागला आहे. नागपूर शहरातील हंसापुरी भागातील १२ वर्षांच्या मुलीने यू-ट्यूबवर गळफास घेण्याचा व्हिडीओ पाहून स्वत: पट्ट्याने गळफास घेतला, त्यात तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता घडली.
शिखा विनोद राठोड ही सहावीत शिकत असणाऱ्या मुलीचे नाव आहे.शिखाने व्हिडीओ पाहून आपला पट्टा पंख्याला बांधला. ती व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे करू लागली. ती ज्या स्टुलवर उभी होती, तो खाली पडला आणि पट्ट्याचा तिच्या गळ्याला फास बसला. शनिवारी दुपारी चार वाजता शिखा आणि लहान बहीण घरात आईचा मोबाईल घेऊन खेळत होते. इंटरनेट सुरू करून यू-ट्यूबवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची क्लिप त्यांनी मोबाईलवर बघितली. त्यानंतर शिखाने यू-ट्यूबव बघितलेल्या व्हिडीओचे प्रात्यक्षीक स्वतावर करून बघितले आणि ते तिच्या जिवावर बेतले.यापूर्वीही तिने हा व्हिडीओ अनेकदा पाहिला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या या कृत्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद राठोड यांचा नाश्त्याचा हातठेला आहे. ते पत्नी, मुलगा व तीन मुलींसह हंसापुरीत राहतात. त्यांची मोठी मुलगी दहावीत तर लहान मुलगी शिखा ही गीतांजली टॉकीजवळील निराला स्कूलमध्ये सातवीत शिकत होती. तिने आपल्या आईलाही या व्हिडीओबाबत सांगितले होते. आईने तेव्हा तिला असे व्हिडीओ न पाहण्याबाबत ताकीद दिली होती.लहान बहिणींच्या लक्षात येण्यापूर्वीच शिखाचा जीव गेला.
सर्व प्रकारचे फीड उपलब्ध |