Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून १४, २०१९

चंद्रपूर जाणारी अवैद्य दारू पवनी पोलिसांनी केली जप्त

मनोज चिचघरे/पवनी:
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना शहरात अवैधरित्या दारू कशी नेता येईल यासाठी अवैध विक्रेते वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवीत असतात ,अशातच जिल्ह्याच्या सीमा लगत ज्या जिल्ह्यात दारू सुरू आहे या जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात दारू आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात अशातच कोणीतरी गुप्त माहिती पोलिसांना देतो  अशा अवैध दारू विक्रेत्यांवर पोलीस पाळत ठेवून बसले असतात

 अश्याच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रित्या दारूची तस्करी करणारे वाहन गुप्त पवनी पोलिसांना मिळाली व त्यांनी  सापळा रचत  चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडली 

 ही कारवाई मंगळवारी करण्यात आली , वाहनासह सहा लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली, प्रणव राजेश ठाकूर (वय 18) रा ,फुलेनगर ब्रह्मपुरी , योगेश विठ्ठल माकडे (वय 26 वर्षे) रा , उदापूर तालुका ब्रह्मपुरी, अमर सिंग टाक राहणार चंद्रपूर गोलू यांच्यावर दारूबंदी कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आला ,पवनी येथील तहसील कार्यालयासमोर अवैध दारू वाहक सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा मारला,अमरसिंग टाका यांच्या सांगण्यावरून प्रणय ठाकूर योगेश माकडे हे दोघे चारचाकी वाहनातून मांगली येथील गोलू नामक युवकाच्या  परवाना प्राप्त देशी दारू भट्टीमधून दारूच्या बाटल्या भरलेल्या 70 खोके नेताना आढळले एक लाख 82 हजार रुपयांची दारू व पाच लाख रुपये किमतीचे चार चाकी गाडी असा एकूण सहा लाख 82 हजार मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पवनीचे ठाणेदार यशवंत सोळसे ,पोलीस हवालदार भरत ढाकणे, संतोष चव्हाण ,रमाकांत दीक्षित ,यांनी पूर्ण केले,

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.