नागपूर / अरूण कराळे
वाडीतील मेघ काँम्प्लेक्स हिरणवार संकुल मध्ये शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिनाचे औचित्त्य साधुन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंन्द्र हरणे यांच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी शेतकरी पिक विमा मदत केंद्राचे फित कापून उद्घाटन करण्यात आले .
१९ जुन १९७७ पासुन शिवसेनेच्या प्रत्येक वर्धापन दिनी शाखांमध्ये विवीध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जातात . वाडी शहर शिवसेनेने केक कापून ५३ वा स्थापना दिन साजरा केला.सेना भवनातुन आलेल्या आदेशानुसार प्रत्येक शेतक-यांचे पिक विम्याचे अर्ज भरुन ते महसुल अधीका-यांच्या मार्गदर्शनात विमा कंपन्या कडे सुपुर्द करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी गावागावातील शाखाप्रमुखांना सोपविली आहे.
प्रत्येक तालुक्यात शेतक-यांना सोयीचे असेल अशा ठिकाणी शिवसेनेचे मदत केंद्रे उघडून राजकारण दुर ठेवुन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे .असे जिल्हाप्रमुख राजेन्द्र हरणे यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले. यावेळी धामना येथील शेतकरी क्रिष्णा वडे यांचा पिक विम्याचा अर्ज भरुन विधानसभा सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे व केंद्र प्रमुख प्रा. मधु माणके पाटील यांनी सुरुवात केली.या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर , हिंगना विधानसभा संघटक रवी जोडांगडे ,सहसंपर्कप्रमुख दिवाकर पाटणे ,तालुका प्रमूख संजय अनासाने ,उपतालुकाप्रमुख रुपेश झाडे , शहरप्रमुख प्रा.मधु माणके पाटील ,विनोद साटिंगे, मदनसिंग राणा , किशोर ढगे , दिवानजी रहांगडाले , संदिप विधळे ,भाऊराव रेवतकर , राम सिंग , पुरुषोत्तम गोरे ,दिनेश तीवारी ,नरेश मसराम ,मोनीका राऊत , सुनीता भोंगळे , भोजराज भोंगळे ,प्रमोद जाधव , विठ्ठल राव व पदाधीकारी उपस्थित होते