परिसरातील चौथी घटना
अंदाजे २० लाख रुपयाचे नुकसान
नागपूर / अरुण कराळे :
वाडीतील एमआयडीसी टी पॉईंट परिसरातील खदान जवळील इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या गोदामाला रविवार १६ जुन रोजी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे,वाडी परिसरातील ही आगीची चौथी घटना आहे.
प्राप्त माहिती नुसार वाडी-एमआयडीसी वळणा शेजारी असलेल्या हिरणवार ले आउटमधील प्लॉट नबंर १५ येथे राकेश जयसिंग हिरणवार यांच्या मालकीची इमारत असून मागील दोन वर्षांपासून शार्प ट्रेडर्स नावाचे अलमन्सूर दामानी रा . नागपूर यांचे साऊंड सिस्टीम इलेक्ट्रॉनिक वस्तूचे गोडावून भाड्याने आहे,रविवार असल्यामुळे गोदाम बंद होते दुपारी 5 च्या सुमारास रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना तसेच आजूबाजूच्या लोकांना गोडावून मधून धूर निघताना दिसला असता लगेच अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली,तसेच प्रत्यक्षदर्शीने १०१ वर घटनेची माहिती दिली असता मालक आधी पैसे भरेल काय असे उत्तर मिळाल्याने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी उशीरा पोहचल्याने आगीने अल्पावधीतच रुद्र रूप धारण करून गोदामातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. यात अंदाजे २० लाख रुपयांच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
आग नियंत्रणात आणण्यासाठी एमआयडीसी अग्निशामक दलाचे प्रभारी शरद जाधव,संजय वैरागडे,गायकवाड,आऊतकर,वाडी नगर परिषद अग्निशामक विभागाचे रोहित शेलारे, धनंजय गोतमारे ,अनुराग पाटील,आनंद शेंडे,कार्तिक शहाणे,वैभव कोडसकर,नितेश वगोर,सचिन मानकर यांनी अथक परिश्रम घेतले.