३० एप्रिलला स्वत उपस्थित राहून उत्तर सादर करा:महिला आयोग
नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील आदिवासी वसतिगृहातील लैंगिक शोषण घटनेप्रकरणी असंवेदनशील वक्तव्य केल्यासंदर्भात राज्य महिला आयोगाने काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार, लोकसभा उमेदवार बाळू धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे यांना आज नोटिस बजावली. ता. 30 एप्रिल रोजी या तिन्ही नेत्यांना व्यक्तीशः हजर राहून स्पष्टीकरण देण्यास या नोटीसात नमुद करण्यात आले आहे.या तिन्ही नोटीसात मजकूर सारखा असून प्रत्तेकाच्या नावाने त्यांना पाठविण्यात आले आहे.
अश्या प्रकारे आहे नोटीस
चंद्रपूर जिल्हातील राजूरा येथील इन्फंट जिजस इंग्लिश सार्वजनिक शाळेच्या वसतिगृहातील अल्पवयीन आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. याबाबत मा.राज्य महिला आयोगाकडून दि.२०/०४/२०१९ रोजी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी शासकीय मदत मिळविण्याच्या हेतूनेच पीडीत मुलींच्या पालकांकडून पोलिसात तक्रारी देण्यात आल्या आहेत असे वक्तव्य आपण माध्यम प्रतिनिर्धीना दिलेल्या मुलाखतीत केले आहे. सदर मुलाखतीची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. तसेच आपण केलेले वरील विधान मंगळवार, दि.२३ एप्रिल २०१९ रोजीच्या वृत्तपत्रांमध्येही छापून आले आहे. आपले हे विधान अल्पवयीन आदिवासी मुलींच्या आणि पालकांच्या हेतूवर संशय घेणारे आहे. सबब, हे गंभीर स्वरूपाचे आहे.
अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैगिक अत्याचारांच्या तक्रारींची सत्यता पडताळण्याचे काम संबंधित तपास यंत्रणांचे व मा.न्यायपालिका यांचे आहे. त्यांचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच आपण उपरोक्त प्रतिक्रिया देणे, वक्तव्य करणे, ही बाब अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची अवहेलना करणारी आहे, असे सकृत दर्शनी दिसते. तरी याबाबत आपण दि.३०.०४.२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता मा.आयोग कार्यालयात व्यक्तिश: हजर राहून खुलासा सादर करावा.असे या महिला आयोगाकडून आलेल्या नोटीसात म्हणण्यात आले आहे.

त्यामुळे आता या प्रकरणामुळे वडेट्टीवारांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे.