पोलीसांचा पत्ता नाही;गावकऱ्यांनी व्यक्त केला रोष
नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर पासून हाकेच्या अंतरावर असेलल्या चंद्रपूर -मुल मार्गावरील लोहारा गावातील,२ शालेय विध्यार्थी गुरुवारी
सकाळपासून बेपत्ता होती.त्यांचे शव आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास लोहारा तलावात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
अंशु घनश्याम कोडापे व रितीक प्रकाश मेश्राम अशी या दोघ मुलांची नवे आहेत .मिळालेल्या माहितीनुसार २ मूल काल सकाळपासून बेपत्ता असल्याने घरचे शोधाशोध करत होते.मात्र त्यांचा काही पत्ता लागत नव्हता.मात्र आज सकाळी 6 वाजता तलाव परिसर पिंजून काढला असता दोघांचे पण शव पाण्यावर तरंगताना दिसून आले. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास देण्यात आली होती. मात्र दुसरा दिवस उजाळूनही पोलीस घटनास्थळी दाखल न झाल्याने गावकऱ्यांनी तसेच मृतकांच्या परिवाराने पोलिसांप्रती रोष व्यक्त केला आहे.गावकर्यांनी शुक्रवारी सकाळी देखील या बाबतची माहिती रामनगर पोलिसांना दिली.मात्र वृत्त लिहेपरीयंत पोलिसांचा पत्ता नव्हता.