नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यात राज्य सरकारने दारूबंदी केल्यानंतरही या जिल्ह्यात दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात बुधवारी दारूचा बाटलांचा महापूर बघायला मिळाला,देशी दारूच्या हजारो खाली बाटला ह्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या आढळल्या या बाटला दिसताच उपस्थितांनी त्याचा विडीओ घेऊन सोशल मिडीयावर चांगलाच फिरवला,चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय चांगल्या हेतूने घेतला असला तरी त्याचा पुरता फज्जा आता या विडीओ ने उडाला आहे.
वर्धा हा गांधीजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर चंद्रपूरात दारूबंदीसाठी महिलांचं मोठं आंदोलन झालं होतं. त्यामुळं सरकारनं या दोन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने चंद्रपुरात दारू सर्रास मिळत आहे,चंद्रपूर येथील CTPS च्या भिंतीला लागून ह्या बाटला दिसल्या आहेत, दारू सुरु असतांना तिनशे ते चारशे कोटी राज्यसरकार चा महसूल मुकला अश्या ज्या बाता सुरु होत्या यावरून किमान लाखो रुपये तरी मह्सूल अवैधरीत्या का होईना शासनाला मिळत आहे इतके मात्र नक्की,शहरातील एखाद्या नाल्याच्या साफसफाई होत असतांना मागील चार वर्षात अश्या कित्तेक बाटला शहरात दारूबंदी असतांना देखील आढळल्या आहेत.
शहरातील मुख्य मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाटल्या आल्या कुठून आणि त्या कुणी फेकल्या, असा प्रश्न बाटलाच्या सड्यांनी निर्माण झालाय. अलीकडेच लोकसभा निवडणूक पार पडली. त्यामुळं प्रचारकांच्या श्रमपरिहारासाठी हा साठा वापरला असावा, अशी चर्चा सध्या चंद्रपुरात रंगली आहे. त्यामुळे चंद्रपूरात दारू येते तरी कुठून? आणि त्याचा पाठलाग होत नसल्याचे आता दिसून आले आहे.