Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २७, २०१९

चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट

kavyashilp Digital Media


वेधशाळेकडून माहिती
चंद्रपूर महानगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा


चंद्रपूर - वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात विदर्भात विशेषतः चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची संभावना आहे. मागील काही दिवसाततापमानात सातत्याने वाढ होत आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेने होणाऱ्या दुष्परिणामांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर शहरमहानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

गेल्या वर्षीचा म्हणजे २०१८ चा उन्हाळा हा १९०१ पासूनचा सर्वाधिक उष्ण उन्हाळा असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र २०१९ हा उच्चांक मोडत आहे. मध्य भारतातल्याबहुतेक सर्वच नगरांमध्ये यंदा उन्हाळ्यात किमान सरासरी 0.5 अंशांनी अधिक तापमान असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

उष्णतेचे दुष्परिणाम व उष्माघातापासून नागरिकांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर मनपातर्फे 'हीट ऍक्शन प्लॅन' (उष्माघात कृती आराखडा) मार्च महिन्यापासूनच राबविण्यास सुरवातकेली आहे. यात उष्माघात प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत असून, विविध स्वयंसेवी संस्था व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईची जागोजागीउपलब्धता करणे, सार्वजनिक बगीचे सुरु राहण्याच्या वेळेत वाढ करणे, मनपा आरोग्य केंद्रांद्वारे उष्माघात रुग्णांवर औषधोपचार सुविधा, जिल्हा सार्वजनिक रुग्णालयात शीतखोली(कोल्ड वॉर्ड) स्थापना, १०८ रुग्णवाहिकेचा सहभाग, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल इत्यादी उपाययोजना राबविल्या जात आहेत.

वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरीरावर तसेच सृष्टीतील इतर जीवजंतूंवर दुष्परीणाम होतात. उष्णतेशी निगडित आजारपण व मृत्यू टाळता येणे शक्य आहे, तरी दरवर्षी अनेक लोकउष्णतेच्या दुष्परिणामांना बळी पडतात. वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात अधिक जाणवते. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराने उष्णतेच्या तीव्र लाटाअनुभवल्या आहेत. 'उष्णतेची लाट ' ही एक नैसर्गिक आपत्ती असल्याने त्याबाबतीत आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

सध्यातरी चंद्रपूर शहरात उष्माघाताचा बळी पडल्याच्या एकही रुग्णाची नोंद झालेली नाही. मात्र वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात असणाऱ्या संभाव्यउष्णतेच्या लाटेपासून सर्वांनी स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परीणाम टाळण्यास भरपूर पाणी प्यावे-तहान लागली नसेल तरी, थंड (गार) पाण्याने डोक्यावरून आंघोळ करावी, थंड पेये - ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, कापडानेडोके झाकावे, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे, सावलीत विश्रांती घ्यावी, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदरस्त्रिया यांची विशेष काळजी घ्यावी.

उष्माघाताची लक्षणे - अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळणे ही लक्षणे आढळल्यास थंडगार पाण्याने अंघोळ करावी. ( डोक्यावरून गारपाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते), थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हासामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा. तसेच १०८ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आकस्मिक आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.