Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

सावली येथील पोलीस ठाण्याचे लोकार्पण

सावली/प्रतिनिधी:

 समाजातील दुर्जन शक्तींचा पराभव करण्यासाठी सज्जनशक्ती सक्रिय होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पोलीस दलाने अतिशय उत्तमपणे आपले कार्य करावे, असे वाटत असेल तर समाजातील सज्जन शक्तीने देखील पोलिसांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सावली शहरातील अद्ययावत पोलीस ठाण्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात अतिशय उत्तम अशा पोलीस वसाहती व पोलीस ठाण्यांचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे नावलौकिक वाढत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सावली येथील आणखी एका पोलीस ठाणे जनतेला लोकार्पित केले. अतिशय उत्तम प्रशासकीय व्यवस्था असणारे हे ठाणे आता सावली शहराची ओळख बनणार आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर खासदार अशोक नेते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, माजी आमदार अतुल देशकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णा सहारे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, नगराध्यक्ष विलास यासलवार, सभापती अविनाश पाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आदींची उपस्थिती होती..

पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यातील पोलीस ठाणे अतिशय उत्तम केले जातील. याशिवाय सीसीटीव्हीने ते जोडले जाईल. येणाऱ्या योग्य व्यक्तीच्या तक्रारी दाखल करून त्याला योग्य न्याय दिला जाईल, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले. संचालन पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांनी केले. .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.