Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

भारिप बहुजन महासंघाची जांभुळघाट येथे बैठक

चिमूर/रोहित रामटेके:

 भिसी जिल्हा परिषद क्षेत्रात येत असलेले आंबोली पंचायत समिती मध्ये दि. ०३/०३/२०१९ ला तालुका अध्यक्ष अँड.नितीनजी रामटेके तसेच सिद्धार्थ चहांदे तालुका संघटक आणि अविनाश बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पंचायत समिती ची समिती स्थापित करण्यात आली आहे. 

बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे झटपटीने कार्याला लागले आहेत त्या साठी गावा खेड्या पासून जे वंचित बहुजन समाज आहेत त्यांच्या सोबत जाऊन त्यांना त्यांचे संविधानिक हक्क घेण्यासाठी एकत्र करीत आहेत. त्यासाठी तालुका असो या गाव खेडे त्या ठिकाणी आपल्या समित्या स्थापन करण्याचे कार्य सुरू केले आहे.

यामध्ये दि. ०३/०३/२०१९ ला रमेशकुमार गजभे कला महाविद्यालय जांभुळघाट या ठिकाणी बैठक संपन्न झाली. यात आंबोली पंचायत समिती साठी अध्यक्ष म्हणून सुरेश मेश्राम ची नियुक्ती करण्यात आली, सचिव म्हणून संजय वाघमारे तर संघटक म्हणून प्रकाश मेश्राम याची नियुक्ती करण्यात आली. या सभेला आंबोली पंचायत समिती मध्ये येत असलेले सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.