Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १४, २०१९

ब्लू माऊंट ने बाजारात आणले नवे उत्पादन




-२०२० अखेर उलाढाल ६०० कोटींपर्यंत नेण्याचा मानस
नागपूर, ११ मार्च, २०१९ :होम व कमर्शियल वॉटर प्युरिफायर क्षेत्रातील अग्रगणी कंपनी ब्लू माऊंट अप्लायन्सेस या कंपनीने त्यांचे अत्याधुनिक उत्पादन ब्लू माऊंट डायरेक्ट’याचे नुकतेच लॉन्च केले आहे. ब्लू माऊंट डायरेक्टच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे ५० हजार ग्राहकांना अॅन्टी ऑक्सीडंट अलकालाईन मिश्रित पाण्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.इतकेच नव्हे तर एक यशस्वी उद्योजक बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्लू माऊंट अप्लायन्सेस ही एक प्रसिद्ध कंपनी असून ब्लू माऊंट आर ओ हे कंपनीचे अलकालाइन आर ओ वॉटर प्युरिफायर ज्यात एलईडी डिस्प्ले आहे त्याने एकूणच या क्षेत्रात क्रांती घडवली आहे.

या नव्या उत्पादनाच्या लॉन्चच्याप्रसंगी ब्लू माऊंट अप्लायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक विशाल गुप्ता म्हणाले, ब्लू माऊंट डायरेक्ट त्यांच्या ग्राहकांना उद्योजक बनण्याची संधी देण्याबरोबरच, आत्मनिर्भर होणे, त्याचबरोबर अलकलाईन आर ओ वॉटर प्युरिफायरचा वापराने उत्तम पाणी कसे मिळवता येऊ शकते याबाबत जागृकता निर्माण करावी हा उद्देश आहे. सध्या बाजारपेठेत पाणी शुद्ध करण्याचा दावा करणारी अनेक उत्पादने व तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक युव्ही आणि आरओ यामुळे ग्राहक संभ्रमात पडू शकतात. इतकेच नव्हे अलकलाईन आरओ यंत्रणेबद्दल माहितीचा अभाव असल्याने ग्राहक नियमित आर ओ वॉटर प्युरिफायरचा वापर करतात. मात्र, याच्या वापराने आरोग्यावर वाइट परिणाम होत असल्याचे पुढे आले आहे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी ब्लू माऊंट च्या वतीने डिलर्स व वितरकांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कंपनीतर्फे नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून त्यांना मिळकतीत कशी वाढ करता येईल याबाबत माहिती देण्याबरोबरच प्रोत्साहीत करण्यात आले. .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.