विद्यार्थ्यांनाच्या सहकार्यातून पाणी अडवा पाणी जिरवा अभियान
चिमूर/ रोहित रामटेके
सध्या पाणी टंचाई हा विषय गंभीर झाला असून महाराष्ट्रातील विविध संघटना पाणी वाचविण्यासाठी कार्य करीत असतात,
याच पद्धतीचा उपक्रम चिमूर येथील प्रभाग क्र,9 केसलापूर येथे नगरसेवक उमेश हिंगे यांचे पुढाकारातून घेण्यात आला, आठवले समाजकार्य महाविद्यालय एम एस डब्लू भाग 2 च्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केसलापूर येथे म्याजीकपीट तयार केले असून या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा या विषयाची जनजागृती करण्याचा सुंदर असा प्रयत्न केलेला आहे, म्याजीकपीठ प्रकल्पाचे भूमिपूजन नागरपरिषद चे नगरसेवक उमेश हिंगे यांचे हस्ते संपन्न झाल्यानंतर हेमंत वरघणे वीणा काकडे यांनी ग्रामवासीयांना मार्गदर्शन केले,
एम. एस. डब्लू. भाग 2 विद्यार्थी शुभम रामटेके, विशाल रामटेके,मयुरी गायकवाड, वैशाली गणवीर, मंजूषा गराठे, मंजूषा ढोके, गुंफा गायकवाड, किरण सेलोरे,अर्चना येरेकर, सोनम चहादे, मोहिनी इंगळे,चैताली भोयर यांनी म्याजीकपीठ बांधून ग्रामस्थांना पाणी नियोजनाचे धडे दिले,