आंबा अंबिका बुद्ध लेणीच्या प्रांगणात थायलंड येथील भीक्खुं सोबत लेणी अभ्यासक.
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यात भारतातील दोन हजार वर्षां पुर्वीच्या सर्वात जास्त लेणी आहेत.सातवाहन काळात जुन्नर हि सातवाहनांची आर्थिक राजधानी होती.कल्याण ते पैठण हा व्यापारी मार्ग जुन्नर येथील नानेघाटातून जातो.अनेक लेण्या या मार्गावर बौद्ध भीक्खुंसाठी सातवाहन राजांनी कोरल्या होत्या.आज दोन हजार वर्षां नंतर सुद्धा या लेणी पाहण्यासाठी देश विदेशातील अनेक अभ्यासक येत असतात.जुन्नर येथील लेणींचा अभ्यास करण्यासाठी थायलंड व बांगलादेश येथील बौद्ध भीक्खु नुकतेच जुन्नर येथे आले होते.त्यांच्या सोबत मुंबई विद्यापीठाच्या पाली विभागाच्या प्रमुख डॉ.योजना भगत, लेणी अभ्यासक संजय जांभुळकर,डॉ.अमोल पुंडे,सिद्धार्थ कसबे,प्रकाश वणवे,अश्विन कांबळे,अक्षय अडबाळे,अक्षय चौरे,पराग छल्लारे,विकास ढोबळे व अनेक विद्यार्थी होते.सातवाहन कालीन नाणेघाट,तुळजा,मानमोडी गटातील अंबा अंबालिका,भुत लेणींचा यावेळी त्यांनी अभ्यास केला.
थायलंडचे भंते अदुल जुनतुपामो यांनी सांगितले की भारत हि बुद्धांची भुमी असुन थाई लोकांना या भुमीचे नेहमीच आकर्षण राहिले आहे.आज या लेणींना भेट देवुन आम्ही धन्य झालो आहोत.येत्या डिसेंबर महिन्यात सुमारे थायलंडचे १०० भीक्खु हे मुंबई येथील नालासोपारा स्तुप ते अजंठा लेणी या मार्गावरील सर्व लेण्या पायी फिरून पाहणार आहेत.दोन हजार वर्षां पुर्वी अनेक भीक्खु या मार्गावरून प्रवास करत या लेण्यांत लोकांना बुद्धाच्या जीवन कल्याणाचा मार्ग सांगत असतील, तो अनुभव आम्हाला अनुभवायचा आहे व लेणी अभ्यासासाठी आम्ही येथे आलो आहोत.
डॉ.योजना भगत यांनी लेणींचे महत्व, उपयोग तसेच
या लेणींसाठी लेणीत कोरलेल्या पालीभाषेतील धम्मलिपीतील शिलालेखावरून या लेणी कोरण्यासाठी राजे,शेतकरी,व्यापारी तसेच ग्रीक लोक आदींनी दान दिल्याचे सांगितले.