नागपूर/खबरबात:
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतरही अवैध दारू येणे थांबत नसल्याने आणि याचमुळे गावातील युवक वाईट मार्गाने लागू नये म्हणून गावासाठी संघर्ष करणाऱ्या गडचांदूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्या महिलांनी मोठ्या धाडसाने गावात येणाऱ्या दारूच्या वाहनासह दारूच्या ७४ पेट्या पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत शाब्बासकीचे काम केले आहे.मात्र महिलांनी केलेल्या या कारवाईचे श्रेय लाटण्याचे काम गडचांदूर पोलिस करीत असल्याचे लक्षात येत आहे.
मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शिरपूर ते गाडेगाव मार्गाने पोलीस पाटील यांच्या घरासमोर टाटा सफारी क्रमांक एच.आर 26 ए.के.0612 वाहनातून अवैध दारू येत असल्याची माहिती गडचांदूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्या महिलांना मिळाली,या समितीतील काही महिलांनी पुढाकार घेत अवैध दारू वाहतूक होणाऱ्या गाडीला पकडण्याचे ठरविले व महिलांनी मोठ्या शिताफीने गाडी पकडली या सोबतच या गाडीत २ ड्रायव्हर होते. त्यातील एक ड्रायवर पडून जाण्यास यशस्वी ठरला मात्र नरेश विठ्ठल बावणे वय 21 रा. खिर्डी ता.कोरपना जि. चंद्रपुर यास ड्रायव्हरला पकडण्यास महिलांना यश आले.व याला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाला गावाच्या लोकांची मोठी मदत मिळाली व याचमुळे महिलांना अवैध दारू पकडता आली.
दारूचे वाहन पकडल्या नंतर याची माहिती पोलिसांना दिली.व नंतर पुढील कारवाई झाली,मात्र पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीमध्ये हि कारवाई गडचांदूर पोलिसांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र हि कारवाई गडचांदूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्या महिलांनी केली.असून त्याला नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण प्रकरणात पोलीस आपली पाठ थोपटवून घेण्यासाठी असे करत असल्याचे लक्षात येत आहे, या कारवाईत बराच संभ्रम निर्माण होत असून पोलिसांना त्यांच्या हदीतील अवैध दारू पास होण्याची माहिती मिळाली नाही का?असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे ,तर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली नसून हि कारवाई महिलांनी करून पोलिसांच्या स्वाधीन आले आहे. सावित्रीच्या लेकीने दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून इतर गावच्या संघर्ष समित्यांनी देखील बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.