Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १९, २०१९

महावितरण कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रविदास जयंती संयुक्तपणे साजरी

नागपूर/प्रतिनीधी:

महावितरण कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रविदास यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. काटोल रोड येथील महावितरण प्रादेशिक संचालक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रविदास यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. 
यावेळी अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, बंडू वासनिक, राकेश जनबंधू, हरीश गजबे, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे आदी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.