चंद्रपूर/प्रतिनिधी:
विदर्भातील ख्यातकीर्त कवी उ. रा. गिरी यांच्या स्मरणात विदर्भ साहित्य संघ नागपूर विदर्भात दरवर्षी विविध ठिकाणी कवी उ.रा. गिरी स्मृती कविसमेलनाचे आयोजन शाखांच्या माध्यमातून करीत असते. हे कविसमेलन प्रतिष्ठेचे समजले जाते.
या वर्षी विदर्भ साहित्य गोंडवन शाखा चंद्रपूरच्या वतीने या कविसंमेलनाचे आयोजन रविवार दिनांक 3 मार्च 2019 ला डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. प्रख्यात कवी प्रमोदकुमार अणेराव यांच्या अध्यक्षेत होणाऱ्या या कविसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी व समीक्षक आणि कादंबरीकार डॉ विद्याधर बनसोड, ज्येष्ठ कवी ना गो थुटे, विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय सदस्य डॉ पद्मरेखा धनकर, युवा कवी पुनीत मातकर आणि गोंडवन शाखेचे शाखाध्यक्ष डॉ शरद सालफळे प्रामुख्याने उपस्थित राहतील. गोंडवन शाखेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात येईल. प्रारंभिक संचालन गीता रायपुरे व कविसंमेलनाचे संचालन नरेशकुमार बोरीकर करतील.
कविसंमेलनात सहभागी होणाऱ्या सर्व कवींना सन्मानपत्र आणि पुस्तक प्रदान करण्यात येतील. तरी काव्यरसिकांनी आणि कवींनी कविसंमेलनात उपस्थित राहण्याचे आवाहन शाखेचे सचिव कवी इरफान शेख, कार्याध्यक्ष किशोर जामदार, कार्यक्रम संयोजक सुनील बावणे व स्वप्नील मेश्राम यांचेसह सर्व सदस्यांनी केले आहे..