Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी ३०, २०१९

मेंडकी येथे जबरानजोतधारक शेतकरी मेळावा

रोहित रामटेके/ ब्रह्मपुरी

श्रमिक एल्गार वनहक्क शेतकरी अभियान (विदर्भ) च्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा तथा वनहक्क शेतकरी अभियानाच्या संयोजिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे अध्यक्षतेखाली जबरानजोत धारक शेतकरी मेळावा घेण्यात आला. 


 या मेळाव्याला रणरागीनी प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सुनबाई सौ. अश्विनी खोब्रागडे या प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होत्या. 


अॅड. गोस्वामी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ब्रम्हपुरी तालुक्यातील १२०० जबरानजोत धारकांचे अपिल जिल्हाधिकारी यांनी एकाच दिवशी खारीज केले असुन हा फार मोठा अन्याय जबरान जोत धारकांवर आहे. श्रमिक एल्गारने खारीज केलेले दावे पुन्हा अपिल केले ही देशातील पहीली घटना आहे असेही यावेळी त्या बोलल्या. ब्रम्हपुरी तालुक्यात वाघाचे हल्ले होत आहेत तसेच वन्यप्राण्यापासुन पिकाची नुकसान होत आहे यावर सरकार चुप्पी साधुन असुन या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सर्वांनी संघटनेला साथ द्यावी असे आव्हानही त्यांनी अध्यक्षीय भाषनातुन केले. जनतेचे प्रश्न निकाली लावेपर्यंत स्वस्थ बसनार नाही यासाठी संघटना मजबुत करु असेही सांगितले. प्रश्नावर बोलण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसुन माणुसकी पाहीजे मात्र आपले लोकप्रतीनीधी संवेदनशुन्य झालेले दिसत आहेत असे मत व्यक्त केले. 


अश्विनी खोब्रागडे यांनी भाषनातुन सांगतांना शेतकरी संघटीत होऊन या अभियात सहभागी होण्याचे आव्हान केले.


 यावेळी श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, महासचिव घनशाम मेश्राम, विदर्भ राज्य आघाडीचे मुल तालुका अध्यक्ष गौरव शामकुळे, श्रमिक एल्गारचे मोतिराम विधाते, यांची भाषने झाली. 


कार्यक्रमाचे संचालन श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते घनशाम लेंझे यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना मांदाडे यांनी केले. 


कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बाळकृष्ण दुमाने, बालाराम चहांदे, विनायक थेरकर, मंगला मिसार, अशोक बोरकर, नरेंद्र राऊत, गिरीधर नाकतोडे, डाक्टर नागोसे, साधुजी भोयर, भय्याजी मेश्राम, श्रावन बुजाडे, शिवम बानबले, पार्वता ठाकरे, विभा मेश्राम , बुधाजी मांदाडे,  गणेश कडस्कर  आदिंनी परीश्रम घेतले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.