जुन्नर /आनंद कांबळे:
जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी ते गुंजाळवाडी रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केले नाहीत ते लवकरात लवकर बुजवावेत यासाठी वरूळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर बेकायदा जमाव जमवून गर्दी करून सार्वजनिक रस्त्यामध्ये ठाण मांडून लोकांना जाण्या येण्याचा रस्ता अडवून लोकांची गैरसोय केली म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या सह५० ते ६० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे
. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके गुंजाळवाडीचे उपसरपंच श्रीकांत वायकर,तालुका युवक अध्यक्ष सुरज वाजगे ,तानाजी वारुळे,वरूळवाडी चे उपसरपंच सचिन वारुळे, सदस्य भाऊ वारुळे, विपुल फुलसुंदर, वरून भुजबळ, पप्पु नायकोडी,राहुल गावडे,व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे५० ते ६० कार्यकर्ते यांच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम३४१ ,१४३,१४७,मपोकाक१३५,सह क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ नुसार दि.१३रोजी सायं गुन्हा दाखल केला आहे याबाबत पो. शिपाई रमेश इचके यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे यांनी म्हटले की, रस्ताच्या दुरावस्थेमुळे गुंजाळवाडी येथील दोन जण अपघात होऊन जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत या घटने मुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यावी म्हणून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनापूर्वी नारायणगाव पोलीस ठाण्यात आंदोलनाबाबतचे रितसर पत्र देण्यात आले आहे. आंदोलकांनी कोणतेही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा उद्रेक केलेला नाही. गुन्हे दाखल होण्याच्या बाबत राजकीय दबाव दिसून येत असल्याचे वाजगे यांनी म्हटले.