चंद्रपूर/प्रतिनिधी:
जंगल आणि वन्यजीव सवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेली चंद्रपूर जिल्यातील “सोशल अक्शन फॉर रूरल डेवलपमेंट” सार्ड या संस्थेच्या वतीने नुकतेच जुनोना या जंगलात एका “ जंगल निरीक्षण शिबिराचे “आयोजन केले होते. सामान्य लोकांमध्ये वन्यजीव, जंगल, पर्यावरण, या विषयी आवड निर्माण व्हावी, वन्यजीवं प्रेमीना या बाबत पायाभूत माहिती असावी, त्यांच्या सवर्धनामध्ये त्यांचा सहभाग वाढवा हां त्या मागच्या हेतु होता.या शिबिराच्या माध्यमातुन् वाघ, बिबट यांच्या पाऊल खुणा ओळखने ,मागील पुढील, डावा उजवा पंजातील फरक ओळखने,चीतल ,सांबर, नीलगाय, भेकर, चौसिंगा इत्यादि प्राण्यांची त्यांच्या पाऊल खुणा तसेच विष्ठे वरुण ओळख करने. पक्षांची ओळख, वनस्पतिचि ओळख इत्यादि भरघोस माहिती देण्यात आली.
या शिबिरा साठी मार्गदर्शक म्हणून पर्यावरण प्रेमी श्री.सुरेश चोपने , श्री.उदयजी पटेल वन्यजीव अभ्यासक व मांनद वन्यजीव रक्षक चंद्रपुर गडचिरोली. कमलेश ठाकुर वन्यजीव अभ्यासक ,श्री.प्रकाश कामडे वन्यजीव अभ्यासक व सार्ड संस्था अध्यक्ष .श्री.आशीष घुमे वन्यजीव अभ्यासक हे प्रामुख्याने उपस्थित होते.जुनोना वनपरिक्षेत्र अधिकारी श्री मो.आ.मा. शेख साहेब, बिटगार्ड सौ.सोनी पंढरे मैडम यानी सुद्धा तीन किलोमीटर झालेल्या या भ्रमतिमध्ये भरपूर मार्दर्शन केले.
ही भ्रमति आटोपताच सर्व वन्यप्रेमींनी जुनोना तलावाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली व तेथील सर्व कचरा उचलून नस्ट केला. या शिबिरात साठी विलास माथनकर, भाविक येरगुडे , मंगेश लहामगे, स्वप्निल राजुरकर,प्रवीण राळे, अतुल वाघमारे, राजेश पेशेट्टीवार, आशीष घुमे, मोंटू खंडेलवार, अनंता धूमर्केत, सुबोध कासुलकर, अयूब पठान, गुरप्रीत सिंग कलसी, यानी अथक परिश्रम घेतले.