Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर ०१, २०१८

शहर काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकर्ता मेळावा

वर्धा/प्रतिनिधी:
 महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी शहरात आयोजित राहुल गांधी यांची पदयात्रा व जाहीर सभा कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आज शहर काँग्रेस कमिटीच्या वतिने स्थानीक प्रदिप मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला़. यावेळी पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट होवुन कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले़.

याप्रसंगी आमदार रणजीत कांबळे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा चारुलता टोकस, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनिल कोल्हे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव शेखर शेंडे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधीर पांगुळ, महिला कांग्रेस अध्यक्षा हेमलता मेघे, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष शब्बीरखान पठाण, मागासवर्गीय सेल चे जिल्हाध्यक्ष धर्मपाल ताकसांडे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष धैर्यशील जगताप, माजी जिल्हापरिषद सदस्य मनोज चांदूरकर, युवक काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष विपीन राऊत, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष प्रतिक भोगे उपस्थित होते़. यावेळी सर्व मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले़ मेळाव्यात काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते़.
आज बाईक रॅली
आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतिने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे़. बाईक रॅली दुपारी 3 वाजता आरती चौक येथील इंदिरा गांधी पुतळा परिसरातुन निघुन शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करेल़. बाईक रॅलीमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी केले आहे़.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.