Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०९, २०१८

नवरात्री उत्सवात मंडळांना सवलतीच्या दरात वीज

अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
नवरात्र रोषणाई साठी इमेज परिणाम
संग्रहित 
चंद्रपूर /प्रतिनिधी:
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच नवरात्रोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीजमीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम नवरात्रोत्सवमंडळांना त्वरीत परत करण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांकरिता तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अधिक 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलींग) आकार असे 4 रुपये 38 पैसे प्रती युनिट असे वीजदर आहेत. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आलेला आहे.
मंडळ वीजजोडणी साठी इमेज परिणाम
सार्वजनिक नवरोत्रोत्सवात मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते.
नवरोत्रोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा नवरोत्रोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक नवरात्रोत्सवमंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकार्यांनी, कार्यकत्र्यांनी 24 तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक 18002333435, 18001023435 व 1912 या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत, असेही आवाहन महावितरणने केले आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.