Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १२, २०१८

गणेश भक्तांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ जोरगेवार यांची निषेध सभा आज

 चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:

मंगळवारी चंद्रपूर येथील गंजवार्ड परिसरातील नवशक्ती गणेश मंडळाती गणेश भक्तावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बुधवारी १२.०९.२०१८ ला किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता शिवाजी चौक चंद्रपूर येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.चंद्रपुरात गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी लावून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या गंजवार्ड परिसरातील गणेश मंडळावर पोलिसांनी कायदयाचा बडगा उगारत डीजे जप्त केला होता.या घटनेनंतर मंडळानी आगमन मिरवणूक पोलीस स्टेशनच्या समोर थांबवली.त्यामुळे गांधी चौक परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.जो पर्यंत डीजे वाजनार नाही तो पर्यंत मिरवणुक सुरु न करण्याचा निर्धार मंडळांनी घेतला होता.त्या हट्टापाई शहर पोलीस स्टेशन समोर प्रशासनाच्या निषेधार्थ नारेबाजी करण्यात आली जमवला पांगविण्यासाठी पोलिसांनी गणेश भक्तांवर लाठीचार्ज केला.

 त्यानंतर गणेशभक्त पुन्हा संतापले व हजारोच्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर एकवटले. त्यानंतर किशोर जोरगेवार यांनी पोलीस स्टेशन गाठत गणेश मंडळ व गणेश भक्तांवर कोणतीही कारवाई न होऊ देता गणेश भक्तांना शांत केले. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी २ वाजता शिवाजी चौक चंद्रपूर येथे किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या निषेध सभेला सर्व गणेश मंडळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जोरगेवार यांच्या कडून करण्यात आले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.