Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर २०, २०१८

आदिवासी गावात धावणार बस


मूल—सावली तालुक्यातील नागरिकांना दिलासा
श्रमिक एल्गारचे मागणीला यश

मूल- तालुक्यातील करवन, काटवन, मुरमाडी, गोलाभूज आणि सावली तालुक्यातील मानकापूर, चेक मानकापूर, सादागड, चारगांव, भारपायली या गावात सप्टेंबर महिण्यांच्या अखेरीस बस सेवा सुरू करण्यांचे राज्य परिवहन विभागाने मान्य केले आहे. श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी या गावात बस सुरू करण्यांची मागणी केली होती. या मागणीचे अनुषंगाने चंद्रपूरचे विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ यांनी अॅड. गोस्वामी यांनी पत्राद्वारे श्रमिक एल्गारची मागणीवर घेतलेला निर्णय कळविला.
चंद्रपूर जिल्हयात तब्बल 334 गावात अजूनही बस सेवा सुरू नसल्यांची गावनिहाय माहिती श्रमिक एल्गारने जिल्हा प्रशासनाला दिली होती. या गावात बस सेवा सुरू करण्यांसाठी आंदोलनही केले होते. काही दिवसापूर्वीच मूल येथेही या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. आदिवासी कल्याण समितीची चंद्रपूर जिल्हयात झालेल्या भेटीतही मूल—सावली तालुक्यातील गावात बस सुरू करावी यासाठी समितीचे अध्यक्ष आमदार प्रा. अशोक उईके यांची भेट घेवून निवेदन दिले होते.
श्रमिक एल्गारचे मागणीवर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयात राज्य परिवहन अधिकारींची या विषयावर बैठक झाली. या बैठकीत मूल तालुक्यातील करवन, काटवन, गोलाभूज, मुरमाळी व सावली तालुक्यातील सादागड, चारगांव, भारपायली, मानकापूर, चेक मानकापूर, मेटेगांव येथे बस सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मूल तालुक्यातील फुलझरी या गावातील रस्त्यावरील पुलाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर या गावातही बस सेवा सुरू करण्यांचेही मान्य करण्यात आले. जिल्हाधिकारी यांचे कक्षात दिनांक 14/9/2018 रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंत्यांना या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यांचे निर्देश देण्यात आले आहे.
ग्रामिण भागातील नागरीकांना तसेच विद्यार्थी व महिलांना या बस सेवेमुळे सुविधा होणार असल्याने अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी परिवहन विभागाचे व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.