Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८

चंद्रपुरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या ४ जणांची सुटका

ललित लांजेवार:
चंद्रपूर शहरातील छोटा नागपूर जवळ विचोडा येथे शेतात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 लोकां सहित 2 लहान मुलांना वाचविण्यात चंद्रपूर पोलीस आपत्ती  व्यवस्थापन चमूला यश आले आहे.
अंकुश मारुती शिंदे वय 25 वर्ष, सौ राखी पंकज शिंदे वय 27,कुमारी अनिता पंकज शिंदे वय 5 वर्ष,कुमारी तनिष्का पंकज शिंदे 4 वर्ष,यांना सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले आहे.शेता काम करत असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला व हे पुराच्या पाण्यात सापडले,याची माहिती परिसरात होताच तत्काळ पोलींना देण्यात आली.  चंद्रपूर पोलीस दलातील पोहवा/  अशोक गरगेलवर, नापोशी/ मंगेश मत्ते, पोशि/ उमेश बनकर , अजित कुमभंवार , गिरीश मरापे, वामन नाक्षीने, दिलीप चव्हाण, संदीप चापले, यांच्या मदतीने या एकाच कुटुंबातील चारही जणांना वाचविण्यात यश आले आहे.





SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.