Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै २४, २०१८

बुधवारी नागपूरचा वीज पुरवठा राहणार बंद


नागपूर/प्रतिनिधी:
अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी तसेच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक २५ जुलै २०१८ रोजी महावितरणकडून काँग्रेस नगर विभागात येणाऱ्या विविध नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सिम्स हॉस्पिटल, टिळक नगर,गोरेपेठ,गिरीपेठ, सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत आठ रास्ता चौक,लक्ष्मी नगर परिसर, सकाळी ८ ते ११ या वेळेत शंकर नगर, काचीपुरा,खरे टाउन,धरमपेठ,भगवाघर ले आऊट, गांधी नगर,शिवाजी नगर,उत्तर अंबाझरी मार्ग, हिल रोड येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७ ते ११ या वेळेत मालवीय नगर, पांडे ले आऊट, योगक्षेम ले लोट, स्नेह नगर, खामला परिसर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.
मेट्रो रेल्वेच्या कामासाठी सकाळी ८ ते १२ या वेळेत अजनी रेल्वे स्टेशन परिसर, शिवाजी सायन्स कॉलेज, काँग्रेस नगर, छोटी धंतोली, शनी मंदिर परिसर, कुंभारटोळी, तेलीपुरा,कोष्टींपुरा . सकाळी ९ ते १२ या वेळेत लोखंडे नगर, पठाण ले आऊट, कामगार कॉलनी, कॉसमॉस टाउन, भांगे ले आऊट, सुर्वे नगर, शहाणे ले आऊट, कन्नमवार नगर, कर्वे नगर, सोमलवाडा, राजीव नगर, सावित्री वस्ती, विमानतळ परिसर, मुळीक कॉम्प्लेक्स, जयताळा,दाते ले आऊट, शारदा नगर, भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, स्वागत सोसायटी, अग्ने ले आऊट, खामला सिंधी कॉलनी, टेलिकॉम नगर,प्रताप नगर, सावरकर नगर, व्यंकटेश नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणकडे पंजीबद्ध केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएस द्वारे देण्यात येणार आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.